खरंच अक्षयकुमारनं प्रभु श्रीरामांचा अवमान केलाय ? ‘गुड न्यूज’च्या ट्रेलरनंतर गोंधळ

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बॉलिवुडची हिट मशिन अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अ‍ॅक्टर्सपैकी एक आहे. सध्या अक्षय त्याचा आगामी चित्रपट गुड न्यूजच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करिना कपूर खान, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांनी काम केले आहे. सध्या या चित्रपटाचे दोन ट्रेलर समोर आले आहेत आणि चाहत्यांनी त्यास खुप पसंतीही दर्शवली आहे.

https://twitter.com/adarshdubey083/status/1208364896657625089

परंतु, आता या चित्रपटावरून ट्विटरवर मोठा वाद सुरू झाला आहे. अक्षय कुमारने चित्रपटात भगवान श्रीरामांचा अवमान केला आहे, असा अरोप काही युजर्सने ट्विटरवर केला आहे. या ट्रेलरच्या शेवटी अक्षय कुमार दुसऱ्या कलाकारासोबत बोलत असून तो त्याने त्याच्या मुलाचे नाव कसे ठेवले आहे हे सांगत आहे. यामध्ये एक द्विअर्थी विनोद ऐकायला येत आहे, तो ऐकून काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हा विनोद सहजतेने न घेता काही लोकांनी अक्षय कुमारला सुनावण्यास सुरूवात केली आहे. लोकांनी अक्षय कुमारच्या चित्रपटांपासून त्याच्या नागरिकत्वापर्यंत सुनावले आहे. अक्षय कुमार भगवान श्रीरामांना अपशब्द वापर असून ते चुकीचे आहे, असे काहींचे म्हणणे आहे.

अक्षय कुमार या विवादात अडकल्यानंतर त्याचे काही चाहते त्याच्या मदतीला धावून आल्याचेही दिसत आहे. अक्षयचे चाहते सलमान खानवरून त्यांना सुनावत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, सलमान खानचे चाहते विनाकारण अक्षय कुमारबाबत अफवा पसरवत आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/