‘चिंताग्रस्त’ असाल तर हे नक्की कराच, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या धावपळीच्या जीवनात मानसिक आजार ही एक संवेदनशील गोष्ट आहे. जेव्हा शरीर स्वास्थाचा प्रश्न उद्भवतो, जर तुम्हाला कोणत्या बाहेरील गोष्टींचा संसर्ग झाला नसेल, तर इतर सर्व आजार आपल्या आतमधूनच निर्माण होतात. जे तुमच्या आतमधून येत आहे, ती तुमची जबाबदारी आहे का? जर तुमचे शरीर आतमधून आजार निर्माण करत असेल, तर त्यावरती उपाय करण्याची जबाबदारी तुमची आहे का? याबाबत सद्गुरू यांनी काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहे.

काही आळशी दुपारपर्यंत एखाद्या बटाट्यासारखे पलंगावरती पडून राहणाऱ्या लोकांना अनेक व्याधींनी ग्रासलेले असतं हे खरं नाही का? त्या लोकांना वाटते की सकाळी ५ वाजता उठून पळायला, पोहायला, खेळायला जाणारे किंवा इतर काही करणारे लोक मूर्ख असतात. फक्त खाऊन पिऊन आणि लोळून ते खरोखर आयुष्याची मजा लुटत आहे असं त्यांना वाटते. मात्र काही काळानंतर, तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. आणि मग स्वतःचे आरोग्य ठीक नसताना एखाद्या व्यक्तीचे आरोग्य चांगले असणे हा त्याच्या नशिबाचा भाग आहे असे त्यांना वाटते. पण नाही! आरोग्य तुमच्या आतून निर्माण केले जाते. संसर्गाच्या माध्यमातून बाहेरील आक्रमण झाले असेल तर ती बाब वेगळी असते.

ज्या वेळेस मानसिक आरोग्याच्या बाबतीत प्रश्न येतो, तेव्हा बोलणे खूप संवेदनशील आहे. परंतु तरीसुद्धा- तुमच्या शरीराला काही होणे ही जर तुमची जबाबदारी असेल, तर तुमच्या मनाला जर काही होत असेल तर ती देखील तुमचीच जबाबदारी नाही का? त्यात अनेक घटकांचे योगदान असू शकते. अगदी शारीरिक आजार सुद्धा अनेक घटकांमुळे उद्भवलेले असू शकतात. असेच मानसिक आजारांबाबतीत सुद्धा असू शकते. पण आपण मानसिक आजार आणि क्लेश/दुःख याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तुमच्या क्लेश/दुःखावर उपचार करून घेऊ शकत नाही, कदाचित ते सुद्धा दुःखी असू शकतात.

जर तुम्ही वैद्यकीयदृष्ट्या आजारी असाल, तर औषधांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आजारावरती काही प्रमाणात मात करू शकता, जे रासायनशास्त्राशी संबंधित आहे. पण रसायनांचा सर्वात अत्याधुनिक कारखाना तुमच्या जवळ आहे. (मानवी शरीरात) समजा तुमचे आरोग्य तुमच्या हातात असते, तर तुम्ही चिंता किंवा आनंद यापैकी कशाची निवड केली असती? नक्कीच, आनंद हीच तुमचं निवड असती.

फक्त काही समस्या आहे – मानवी शरीराची रासायनिक क्रिया तुमच्या हाताबाहेर चालली आहे, मग कारण कोणतेही असो. संसर्गित असू शकतो, अनुवंशिक असू शकतात किंवा बाह्य उत्तेजके असू शकतात, अनेक कारणे आहे. मात्र तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही तुमची सर्वप्रथम जबाबदारी नाही का? ज्या क्षणी ही जबाबदारी माझी नाही असा विचार तुम्ही करायला सुरुवात करता- तेंव्हा ते तुमच्या हातातून पूर्णरीत्या निसटते. ही तुमची जबाबदारी आहे असा विचार तुम्ही केलात, तर उद्या सकाळपर्यंत कदाचित सर्व आजारांवर उपाय मिळणार नाही, पण तुम्ही स्वास्थाच्या दिशेने प्रवास सुरु करू शकता.

काही महत्वाचे – तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुम्ही काय नाही, याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्याकडे असायला हवी. हे माझे मूलभूत कर्तव्य आहे. धर्मातून जबाबदारीपर्यन्त. धर्म म्हणजे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चुकीच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वर्गात आहे असा गैरसमज. समस्या अशी आहे की तुम्ही एका गोल ग्रहावर आहात आणि तो गोलगोल फिरतोय. विश्वात कोठेही “हि वरची बाजू आहे” असे लिहून ठेवलेले नाही. तुम्हाला वरची बाजू कोणती हे सुद्धा माहिती नसेल, तर अपरिहार्यपणे, तुम्ही चुकीच्या दिशेला नजर ठेवत आहात.