पुरंदर तालुक्यात मतदानास मतदारांचा चांगला प्रतिसाद

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मतदानाला संमिश्र असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अनेक मोठ्या गावांमधील मतदानाची टक्केवारी हि 30 ते 40 टक्क्यांच्या आसपास होती तर छोट्या गावांमध्ये हीच टक्केवारी 50 टक्क्यांच्या पुढे नोंदवण्यात आली आहे.

आज मतदानाच्या दिवशी सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रांकडे गर्दी केली होती. ही परिस्थिती दुपार नंतर बदलेल असे वाटत होते परंतु सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत परिस्थितीमध्ये अधिक गर्दी असल्याचे पहायला मिळाले. मतदान करण्यासाठी मतदारांनी रांग लावल्या होत्या. मतदानाची आकडेवारी पाहता मतदारांमध्ये तरुण, मध्यम तसेच वयोवृद्ध गटातील मतदार दिसून आले. शेवटी मतदान टक्केवारी मध्ये वाढ झाली आणि पुरंदर तालुक्यातील मतदान 56 टक्क्यांच्या पुढे नोंदवण्यात आली.