भोसरीत रिव्हर सायक्लोथॉन रॅलीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान जनजागृती मोहिमे अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे व महेशदादा स्पोर्ट्स फौंडेशन भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने “ रिव्हर सायक्लोथॉन “ रॅलीला आमदार महेश लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पहिल्या टप्यातील रिव्हर सायक्लोथॉन रॅलीत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्याना झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. चार हजार विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग नोंदविला.

महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय खेळाडू अंजली भागवत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, प्रभारी क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, क्रीडाअधिकारी रज्जाक पानसरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवी, जयश्री भोज, राजू कोतवाल, विश्वास गेंगजे, नंदकुमार फुगे, अविरत श्रमदान संस्थेचे डॉ.निलेश लोंढे, दिंगबर जोशी, सचिन लांडगे, बार असोसियशनचे प्रतिनीधी, डॉक्टर असोसियशनचे प्रतिनिधी व मनपाच्या शाळेतील वद्यार्थीनी, विदयार्थी उपस्थित होते.

नदी स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणेकामी घेण्यात आलेल्या “ रिव्हर सायक्लोथॉन “ रॅलीमध्ये चारहजार विद्यार्थी, विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला. दुस-या टप्यातील रॅलीमध्ये आमदार महेश लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहभाग घेवून कै. अंकुशराव लांडगे नाटयगृहासमोरील गाव मैदान ते तिर्थक्षेत्र आळंदी व पुन्हा तिर्थक्षेत्र आळंदी ते कै. अंकुशराव लांडगे नाटयगृहासमोरील गाव मैदानापर्यंत २५ किलोमीटरचे अंतर सायकलिंग करुन पार पाडले. तिस-या टप्प्यातील रिव्हर सायक्लोथॉन रॅलीत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना माहापौर राहुल जाधव यांनी झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला.

पिंपरी-चिंचवड शहरातील खाजगी व मनपा शाळांमध्ये मी पाहिलेली नदी या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये ६४ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  रिव्हर सायक्लोथॉन “ रॅलीमध्ये सिध्येश्वर, प्रियदर्शनी, महात्मा फुले, रामभाऊ मोझे, एसएनबीपी, मंजीरीबाई, समता, मास्टर माईड, विद्यानिकेतन, गायत्री, श्रीराम, संतज्ञानेश्वर, संतसाई आदी शाळांनी भाग घेतला होता.

पहिल्या टप्यातील “ रिव्हर सायक्लोथॉन रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदान, भोसरी आळंदी रोडमार्ग मॅगझीन चौका कडुन आळंदी देहू फाटा, डुडुळगाव व मोशीवरुन परत भोसरी गावजत्रा मैदान असा असून यामध्ये 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दुस-या टप्यातील “ रिव्हर सायक्लोथॉन रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदान, ते कृषी उत्पन्न बाजार समीती, जाधववाडी, स्पाईनरोड मार्गाने हायवे व परत भोसरी गावजत्रा मैदान असा असून यामध्ये एक हजार  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तिस-या टप्यातील “ रिव्हर सायक्लोथॉन रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदान, ते गणेश साम्राज्य चौक, स्पाईन रोड सर्कल पासून परत भोसरी गावजत्रा मैदान असा असून यामध्ये 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.