फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसच्या या स्कीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा मिळतील 4950 रूपये, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अन्न, वस्त्र, निवारा यांच्या बरोबरीने माणसासाठी अत्यंत गरजेची बनलेली गोष्ट म्हणजे आर्थिक गुंतवणूक होय. आपण पैसे कमावतो, खर्च करतो तसेच भविष्याची तरतूद म्हणून अनेक ठिकाणी गुंतवतो. मात्र ही गुंतवणूक कुठे, कशी, किती प्रमाणात करावी याबद्दल अनेकांना माहिती नसते. सध्या जिथे गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्सही मिळतील आणि गुंतवणूक सुरक्षितही राहील. या हिशोबाने पोस्ट ऑफिसची एक अशी स्किम आहे Monthly Income Plan, ज्यात एका निश्चित कालावधीत चांगले रिटर्न्सही मिळतील आणि त्याशिवाय दरमहा एक निश्चित रक्कम देखील मिळणार आहे.
पोस्टाच्या Monthly Income Plan ची विशेष बाब म्हणजे याचे व्याज प्रत्येक वर्षी जोडले जाते. या स्किममध्ये Joint Account ओपन करून त्यात 9 लाख एकत्रच जमा केल्यास दरमहा 4950 रुपये मिळतील. मुख्य गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 6.6 टक्क्यांच्या दराने 59,400 रुपये होते. त्यानुसार व्याजाची मासिक रक्कम 4950 रुपये होते. जी रक्कम दर महिन्याला घेता येईल ती केवळ व्याज असेल अन् तुमची मूळ गुंतवणूक तशीच राहणार आहे. Maturity झाल्यानंतर ही रक्कम काढता येईल. 4950 रुपयांचे मासिक व्याज 5 वर्षांच्या Maturity हिशोबाने मिळत राहणार आहे. यात Maturity वाढवताही येते. या योजनेत सिंगल अकाऊंट ओपन केल्यास जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करता येतात. तर जॉईंट अकाउंट ओपन केल्यास, 9 लाख रुपये जमा करता येतात.