फायद्याची गोष्ट ! सोन्याच्या दरात ‘तेजी’, घरी ‘पडून’ असलेल्या ‘गोल्ड’वर करा ‘अशा’ प्रकारे कमाई, जाणून घ्या

नवी दिल्ली वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबरच देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीतही सतत वाढ होत आहे. सोमवारी सोन्याची किंमती 40,000 रुपये प्रति 10 ग्राम (जीएसटीसह) रुपयांच्या वर गेली. अनेक जेष्ठ लोक सांगतात की, सोने हे वाईट काळात नेहमी उपयोगी पडते.

आपल्या घरात ठेवलेल्या सोन्याचे दागिने देखील आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) अलीकडेच एक योजना सुरू केली आहे. गोल्ड डिपॉझिट स्कीम असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या घरात असलेले सोने बँकेत ठेऊन त्यावर व्याज मिळवू शकता.

सोने डिपॉझिट केल्यावर मिळते प्रमाणपत्र
स्टेट बँकेच्या या योजनेत सोने जमा करताना तुमच्या सोन्याची शुद्धता तपासली जाते. शुद्धतेच्या आधारे बँकेकडून प्रमाणपत्र दिले जाते. आपण आपल्या सोन्याच्या ठेवी 1 ते 15 वर्षे ठेवू शकता.
ठेवीचा कालावधी संपल्यानंतर ते व्याजासह पैसे काढता येतात. ग्राहक इच्छुक असेल तर सोन्याच्या ऐवजी त्याची रोख रक्कमही त्याला मिळू शकते.

यात कोण गुंतवणूक करू शकेल
एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ठेवीदार एकट्याचे किंवा संयुक्त खाते उघडू शकतो. HUF, पार्टनरशिप फर्म देखील यात गुंतवणूक करु शकतात. या योजनेंतर्गत किमान 30 ग्रॅम सोने जमा करणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त सोने जमा करण्यास कोणतीही मर्यादा नाही.

किती वर्षांसाठी ठेवावे लागते सोने –
एसबीआयमध्ये या योजनेला शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (एसटीबीडी) असे नाव देण्यात आले आहे. एसबीआय योजनांमध्ये 1 – 3 वर्षासाठी सोने जमा केले जाते. त्याच वेळी, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या ठेवीचा कालावधी 5 – 7 आणि 12 – 15 वर्षे आहे. तसेच, जर गुंतवणूकदार एका वर्षाच्या निश्चित वेळेपूर्वी पैसे काढून घेत असेल तर त्याला व्याजावर दंड भरावा लागेल. मध्यम मुदतीच्या कालावधीत गुंतवणूकदार 3 वर्षांनंतर या योजनेतून बाहेर पडू शकतात. दीर्घकालीन योजना केवळ 5 वर्षानंतर मागे घेता येतील. ठरलेल्या वेळेआधी सोने किंवा पैसे काढल्यास दंड भरावा लागेल.

५ टक्क्यांपर्यंत मिळते व्याज –
STBD योजना जास्तीत जास्त 5 टक्के व्याज देते. एका वर्षाच्या गुंतवणूकीवर 0.50 टक्के व्याज मिळते. दोन वर्षांच्या गुंतवणूकीवर 0.55 टक्के आणि तीन वर्षांच्या गुंतवणूकीवर 0.60 टक्के व्याज आहे. त्याच वेळी, मध्यम मुदतीवर म्हणजेच 5 – 7 वर्षे गुंतवणूकीवर आपल्याला वार्षिक 2.25 टक्के व्याज मिळते. दीर्घ मुदतीविषयी बोलल्यास, 12 ते 15 वर्षांच्या गुंतवणूकीवर वर्षाला 2 ते 5 टक्के व्याज दिले जाते.

निष्क्रिय (पडून असलेल्या) सोन्यावरही मिळणार व्याज –
लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यात तुम्हाला काहीही मिळत नाही. त्याचबरोबर या योजनेतील निष्क्रिय सोन्यावरही व्याज उपलब्ध आहे. एसबीआय गोल्ड डिपॉझिट योजनेंतर्गत व्याज सोन्याच्या चलनात गणले जाते आणि तितकी रक्कमही दिली जाते.

या शाखांमध्ये गुंतवणूक करू शकता –
या योजनेचा लाभ फक्त एसबीआयच्या निवडक शाखांमध्ये उपलब्ध आहे. यात दिल्लीची पीबी शाखा, चांदणी चौकातील एसएमई शाखा, कोयंबटूर शाखा, हैदराबाद मुख्य शाखा, मुंबईची बुलियन शाखा यांचा समावेश आहे. या सर्व शाखांमध्ये सोने ठेवून आपण याचा फायदा घेऊ शकता.

सोन्याचे भाव वाढल्यावर जास्त फायदा –
एसबीआयच्या या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला त्या दिवसाच्या किंमतीच्या मूल्यानुसार पैसे दिले जातील. आता जेव्हा सोन्याचे दर सतत वाढत असतात. त्यांची आणखी वाढ होण्याचीही अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळाला आहे. सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

इनकम टॅक्समध्ये सुद्धा मिळते सूट –
एसबीआयच्या या योजनेत तुम्हाला सोन्याच्या गुंतवणूकीवरही आयकरात सूट मिळते. त्याच वेळी, आपल्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक सोने असल्यास आपल्याला त्यावर कर भरावा लागेल. एसबीआय गोल्ड डिपॉझिट योजनांवर कोणताही मालमत्ता कर, भांडवली नफा कर किंवा आयकर भरला जात नाही.

स्कीममध्ये ठरवलेल्या सोन्यावर मिळते कर्ज –
एसबीआयच्या गोल्ड डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला या सोन्यावर कर्ज सुविधा देखील मिळते. सोन्याच्या मूळ किंमतीच्या 75 टक्के पर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त –