पुणे पोलिसांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या मुलीचे प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सुट्टीवर असताना देखील पुणे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत: च्या जीवाची पर्वा न करता आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण वाचवले. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या सद्दाम शब्बीर शेख यांनी जांभुळवाडी तलावात आत्महत्या करणाऱ्या एका तरुणीच प्राण वाचवले. सुट्टीवर असताना देखील आपले कर्तव्य न विसरता त्यांनी तरुणीचे प्राण वाचवल्याने पुणे पोलिसांकडून आणि नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बुधवारी सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास एक तरुणी जांभुळवाडी तलावामध्ये बुडत होती. तिने वाचवण्यासाठी आरडा ओरड केली मात्र बघ्यांपैकी कोणीही तिला वाचवण्याचे धाडस केले नाही. मात्र, त्याचवेळी तेथून जाणाऱ्या शेख यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावात उडी मारुन बुडणाऱ्या तरुणीला वाचले. मुलीची चौकशी केली असता तिने केवळ स्नेहा असे नाव सांगितले मात्र, तिने आत्महत्या करण्याचे कारण सांगितले नाही.

दरम्यान, मुलगी पाण्यात बुडत असताना त्याठिकाणी बघ्यांनी गर्दी केली. मात्र, त्यापैकी कोणीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. बुडणाऱ्या मुलीचे चित्रीकरण आपल्या मोबाइलमध्ये चित्रीत करण्यात सगळे व्यस्त होते. परंतु सुट्टीवर असताना देखील आपले कर्तव्य पार पाडत शेख यांनी मुलीचे प्राण वाचवले. मी फक्त माझे कर्तव्या केले असल्याची भावना सद्दाम शेख यांनी यावेळी व्यक्त केली.

Visit : Policenama.com