मोदी सरकारचे छोट्या उद्योजकांना गिफ्ट ! फक्त SMS द्वारे GST रिटर्न भरा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 1 एप्रिल 2020 पासून वस्तू व सेवा कर (GST) भरण्यासाठी व्यापारी फोनवरुन फक्त एसएमएस पाठवून जीएसटी रिटर्न फाइल करु शकणार आहेत. या सुविधेचा लाभ घेण्याची एकमात्र अट म्हणजे व्यापाऱ्यांचा टर्नओव्हर निल असला पाहिजे. छोट्या व्यापाऱ्यांना सहज आणि सहम फॉर्ममधून तीन महिन्यातून एकदा रिटर्न भरावा लागणार आहे.

जीएसटी नंबर घेतला असतानाही रिर्टन फाइल दाखल करताना काही व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी नव्या यंत्रणेत एक विशेष वर्ग तयार करण्यात आला आहे. अशा करदात्यांना केवळ त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून एसएमएस पाठवून आपला जीएसटी रिटर्न जमा करता येईल.

जीएसटी रिटर्न SMS ने भरला जाईल –

हिंदू बिझिनेस लाइनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, नवीन प्रणालीनुसार, निल टर्नओव्हर असणाऱ्या व्यापाऱ्यांनाच फक्त एसएमएस पाठवावा लागणार आहे आणि त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठविला जाईल. हा ओटीपी परत टाकल्यावरच त्यांचा रिटर्न भरला जाईल.

सहज आणि सुगम जीएसटी रिटर्न फॉर्म एप्रिल 2020 पासून उपलब्ध होणार –

प्रकाश कुमार म्हणाले की, वर्षात पाच कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असणार्‍या व्यापाऱ्यांना पूर्वी जीएसटीएन 3 बी फॉर्म (GSTR 3B) भरणे बंधनकारक होते, परंतु आता या मर्यादेपर्यंत व्यवसाय करणाऱ्यांसाठी 2 फॉर्म तयार केले गेले आहेत.

जे व्यापारी वर्षात पाच कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करतात आणि बी 2 बी (B2B) व्यवसाय करतात त्यांच्यासाठी आरईटी -2(RET-2) फॉर्म तयार केला आहे. या फॉर्मलाच सहज नाव देण्यात आले आहे. यामध्ये व्यापाऱ्यांना दरमहा कर भरावा लागेल, मात्र, रिटर्न तीन महिन्यात भरावा लागणार आहे. वर्षभरात पाच कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्यांसाठी जीएसटी आरईटी-3 किंवा सुगम फॉर्म तयार करण्यात आला आहे. हा फॉर्म सुद्धा त्रैमासिक पद्धतीने भरला जाईल. मात्र, कर महिन्याला भरावा लागणार आहे.

Visit : policenama.com