Google नं बंद केले त्याचे ‘हे’ 10 पॉप्युलर APP आणि सुविधा, आता वापरता येणार नाहीत, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – गुगल ही अ‍ॅप सर्विसमधील सर्वात मोठी कंपनी आहे. अरबो लोक या सर्विसचा लाभ घेतात. गुगल कंपनी आपल्या सर्च इंजिनसाठी, अ‍ॅण्ड्राइडसाठी आणि यूट्यूब सर्विससाठी ओळखली जाते. परंतू कंपनीने आतापर्यंत अशा अनेक पॉप्युलर सेवा होत्या ज्या मागील वर्षी बंद केल्या. ज्या सेवा कंपनीने बंद केल्या त्या बऱ्याच जुन्या होत्या तर काही सेवा, अ‍ॅप काही महिन्यातच बंद करण्यात आले.

1. Google+ – गुगलने ही सेवा 2019 साली बंद केली जी 8 वर्ष जुनी होती. कंपनीने गुगल प्लसला बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 5 कोटी पेक्षा जास्त यूजर्सचा डेटा सुरक्षित केला आणि त्यानंतर ही सेवा बंद केली.

2. Google Allo – गुगल ऐलो कंपनीचे इंटरनेट बेस्ड टेक्स्ट मॅसेजिंग अ‍ॅप आहे. ही सेवा अ‍ॅण्ड्राइड, आयओएस आणि वेब या सर्वासाठी तयार करण्यात आली. या अ‍ॅपमध्ये वर्चुअल असिस्टेंड सारखे फिचर देण्यात आले होते. हे अ‍ॅप देखील गुगलने मार्च 2019 साली बंद केले.

3. Inbox by Gmail – जीमेलने हे अ‍ॅप 2014 साली लॉन्च केले. या अ‍ॅपला प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी लॉन्च करण्यात आले होते, ज्याचा फायदा ते यूजर्स घेऊ शकतं होते ज्यांना दिवसाला जास्त ईमेल रिसीव करावे लागत होते. हेच फीचर जीमेल मध्ये देखील होते त्यामुळे ही जुनी इनबॉक्स बाय जीमेल सेवा बंद करण्यात आली. यानंतर फक्त जीमेलवर फोकस करण्यात आले.

4. Youtube Gaming – गुगलने या सेवेला बंद करण्याची घोषणा केली होती या सेवेचे विलिनिकरण यूट्यूब प्लेटफॉर्मबरोबर करण्यात आले.

5. Google URL Shortener – गूगलने आपली जुनी सेवा यूआरएल शॉर्टनर याच वर्षी बंद केली. ही 9 वर्ष जुनी सेवा होती.

6. Youtube Messages – ही सेवा गुगलने याच वर्षी बंद केली. या सेवेमुळे यूजर्स दुसऱ्यांना डायरेक्ट मेसेज आणि व्हिडिओ शेअर करु शकत होते.

7. Areo – या वर्षी हे अ‍ॅप बंद करण्यात आले. या अ‍ॅपचा वापर करुन यूजर्स रेस्टॉरेंटमधून जेवण ऑर्डर करणे, अपॉइंट्मेंटची बुकिंग करणे आणि लोकल सेवेचा लाभ घेऊ शकत होते.

8. Chromecast Audio – हे गुगलचे हार्डवेअर प्रोडक्ट आहे, ज्याला कंपनीने आता बंद केले आहे. या तीन वर्ष जुन्या प्रोडक्टने यूजर कोणत्याही डिवाइसचा ऑडिओ स्पीकरवर ऐकू शकत होते.

9. Google Trips – या अ‍ॅपच्या मदतीने यूजर आपला भटकंतीचा प्लॅन करु शकत होता. यात फ्लाइट, हॉटेल, कार आणि रेस्टॉरेंट रिसर्वेशन देखील करु शकत होते. हे 3 वर्ष जुने अ‍ॅप होते.

10. Data Saver Extention – हे चार वर्ष जुने अ‍ॅप गुगलने या वर्षी बंद केले आहे. क्रोमसाठी लॉन्च करण्यात आलेल्या डेटा सेवर एक्सटेंशनपासून इंटरनेटवर ब्राउजिंग करताना यूजरचा डाटा सेव्ह करण्यात येत होता.

Visit : Policenama.com