सावधान ! Google चे कर्मचारी ऐकतात तुमचं ‘प्रायव्हेट’ रेकॉर्डिंग, Google नेही केलं मान्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेकदा ऐकतो की GOOGLE आपल्याला ट्रॅक करते, GOOGLE तुमच्या बिहेविअरवर नजर ठेवते. परंतू आता आणखी एक अत्यंत महत्वाचे म्हणजे GOOGLE तुमचे प्रायवेट वॉइस रेकॉर्ड करते. हे होते पण सर्व काही तुमच्या सहमतीने, कारण गुगलची सेवा वापरताना तुम्हाला तुमची परवानगी मागितली जाते. त्यावेळी तुम्ही Yes, Agree हा पर्याय निवडतात.

गुगलने केले मान्य
गुगलने हे मान्य केले आहे. google चे कर्मचारी google home smart speakers च्या आधारे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकते. गुगल अशा प्रकारची रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी लॅग्युवेज एक्सपर्ट ठेवते. एक्स्पर्ट्स यूजर्सने गुगल होम असिस्टेंटला दिलेल्या कमांड ऐकतात. म्हणजे तुम्ही जे काही बोलतात ती ऐकले जाते.
गुगलकडून सांगण्यात आले की यूजर्सची रिकॉर्डिंग यासाठी ऐकली जाते जेणे करुन वॉइस रिकॉग्निशन तंत्रज्ञानाला आधिक चांगले करता येईल. परंतू यातून युजर्सच्या प्रायवसीचा भंग नाही का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. याचे उत्तर गुगलकडून देण्यात येणे गरजेचे आहेत.

असे ऐकला जातो वॉइस
गुगलकडून सांगण्यात आले की आम्ही जग भरातील लॅग्वेज एक्स्पर्ट्स बरोबर पार्टनरशिप करतो जेणे करुन छोट्या प्रमाणात प्रश्नांना ट्रांस्क्राइब करता येईल. जेणे करुन स्पीच टेक्नलॉजी सुधारता येईल. गुगल ने एक ब्लॉगपोस्ट मध्ये म्हणले आहे की, स्पीच टेक्नॉलजीमधील ही कठीण प्रोसेस आहे आणि गुगल असिस्टेंट सारख्या प्रॉडक्ट्ससाठी हे आवश्यक आहे.

Google Voice & Audio Activity
या फिचर अंतर्गत कंपनी तुमचा वॉइस आणि दुसरे ऑडिओ ok google कमांड्सच्या दरम्यान रेकॉर्ड करण्यात येते. रेकॉर्ड करण्यात आलेल्या वॉइस रेकॉर्डला कंपनी युजर अकाऊंटमध्ये सेव करते. विशेष म्हणजे ऑडिओ ऑफलाइन असताना देखील सेव होतात. असे असले तरी तुमच्या जीमेल अकाऊंटच्या सेटिंग मधून हे ऑफ देखील करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या