पोलीसनामा ऑनलाइन टीम – गुगलने जीमेलच्या लोगोमध्ये मोठा (Gmail New Logo) बदल केला आहे. जीमेलचा लोगो गुगलने बदलला असून त्यातील आयकॉनिक इनवेलप काढलं जाणार आहे. आता युसर्सना जीमेलच्या लोगोत फक्त ‘M’ हे अक्षर दिसणार आहे. या अक्षरात लाल, निळा, हिरवा आणि पिवळ्या रंगांचं मिश्रण असेल. हा नवीन लोगो लवकरच आपल्या सर्वांना दिसणार आहे. जीमेलच्या लोगोसोबत प्रसिध्द जी सुटच्या सेवेचंही गुगलने रिब्रॅंडींग करुन जी सूट वर्कप्लेस असं केलं आहे.
यापुर्वी व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंग सर्विस ‘मीट’मध्येही नव्या दोन बदल्याच्या घोषणा गुगलने केली होती. जी सेवा 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तसेच गूगलने कॅंलंडर, डॉक्स, मीट आणि शीट्सच्या लोगोतही अपडेट केले आहेत. या सर्वांचा उद्देश जीमेलच्या रचनेशी जुळवाजुळव करणे हा होता.
आता जीमेल कसं दिसणार-
सध्याचा जीमेलचा लोगो लाल रंगाच्या इनवेलपचाच आहे. ज्या लोगोत M या शब्दात इनवेलपची प्रतिमा आहे. कंपनीने आपल्या तज्ज्ञ टीमशी बरीच चर्चा करून जीमेलचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही ही प्रक्रिया सोपी नव्हती ,असं जीमेल टीमचे म्हटले आहे. पुढे बोलताना गुगलमधील तज्ज्ञांनी सांगितले की, यापुर्वी जीमेलचा लोगो बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा आम्हाला नकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर आमच्या प्रयत्न मंदावले होते. आताचा जीमेल लोगो अतिशय विचारपूर्वक बदलण्यात आला आहे आणि तो अधिक चांगल्या प्रकारे सादर केला जात आहे. आता जीमेलचा लोगो अगदी रंगीबेरंगी आणि आधुनिक दिसत आहे.
कोरोना काळात घरातूनच कामाचा ट्रेंड वाढल्यामुळे लोकांना सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळाव्यात असं वाटते, जे त्यांच्या कामासाठी उपयुक्त ठरते. गुगलने युजर्ससाठी एक इंटिग्रेटेड सिस्टीम वर्कप्लेस लाँच केलेले आहे. पुढील काळात गुगल आपल्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये जी सूट युजर्स अजून बऱ्याच सुविधांचा लाभ घेतील आणि फ्री युजर्स मर्यादित सुविधांचाच लाभ घेऊ शकतात.
गुगलने आणखी कोणते बदल केले?
गुगलने जी सूटसाठी एक इंटिग्रेटेड यंत्रणा तयार केली आहे, ज्यामध्ये जीमेल, मीट आणि चॅटसह इतर सुविधा एकाच ठिकाणी दिली जात आहेत आणि त्याच्या वर्कप्लेसला नाव देण्यात आलं आहे. यामुळे युजर्स एकाच ठिकाणी विविध सुविधांचा लाभ घेऊ शकतो.