Google चा मोठा खुलासा ! ‘OK Google’ बोलल्यानंतर कंपनीचे कर्मचारी ऐकतात तुमचं बोलणं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था   गूगल (Google) हे एक ॲप्लिकेशन आहे, अर्थात एक निर्जीव गोष्ट आहे. गूगल एखादी व्यक्ती नाही आहे की जी माहिती हवी आहे ते नीट समजून घेईल आणि नंतर मागणाऱ्याला पुरवेल. गूगल तुम्ही दिलेल्या शब्दांवरून हवी असलेली गोष्ट सर्च करतो. दिलेल्या शब्दांमधून तो तसेच शब्द कोणत्या वेबसाइटवर आहेत हे शोधतो. आणि रिजल्ट देतो. तसेच डेटा गोपनीयता आणि सुरक्षेबाबत एका बैठकी दरम्यान गुगलने एक मोठा खुलासा केला आहे. OK Google बोलल्यानंतर गुगल असिस्टेंटला (Google Assistant) जे काही विचारलं जात, त्याचं रेकॉर्डिंग गुगलचे कर्मचारी देखील (Google Employees) ऐकत असल्याचं गुगलने सांगितलं आहे. याबाबत माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीला गुगलने ही माहिती दिलीय. google assistant ok google users private recording listen google employees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

कंपनीने यापूर्वीच याबाबत माहिती पब्लिक डोमेनवर आहे. काही वर्षांपूर्वी स्वत:चं याबाबत माहिती दिली होती.
शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे वापरकर्त्याच्या प्रायव्हसीचे गंभीर उल्लंघन असल्याचं सांगितलं आहे.
तर या समितीकडून तात्काळ रिपोर्ट बनवून सरकारला काही सूचना देण्यात येणार आहेत.
गुगल असिस्टेंट सुरू करुन ‘ओके गुगल’ बोलल्यानंतर समोर जे कोणतं संभाषण होतं,
ते गुगलचे कर्मचारी  ऐकत असल्याचं गुगलने मान्य केलं आहे.
याबाबत माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुगल प्रोडक्ट मॅनेजर डेव्हिड मोनसी (Manager David Monsieur) यांनी 2019 रोजी याबाबत माहिती एका पोस्टद्वारे मान्य केली होती.
त्यांचे भाषा तज्ञ रेकॉर्डिंग ऐकतात, जेणेकरुन गुगल स्पीच सर्विस जास्त चांगली करण्यात मदत होणार आहे.
स्पीच रेक्गनेशन अधिक चांगलं करण्यासाठी कर्मचारी हे रेकॉर्डिंग ऐकत असल्याचं गुगल ने सांगितलं आहे. यावरून अमेरिकेमध्ये सवाल उपस्थित केले आहे.
याबाबत तेथे खटला देखील चालला आहे. तसेच खासगी माहिती ऐकली जात नाही.
फक्त सामान्य बोलणं रेकॉर्ड केलं जात. पण या दोघांमध्ये हा फरक कसा केला जातो,
यासंदर्भात गुगल ने सांगितलं आहे.

या दरम्यान, गुगल ने आपल्या अटींमध्ये गुगल स्मार्ट स्पीकर्स आणि गुगल असिस्टेंटच्या माध्यमातून बोलणं रेकॉर्ड केल्याचं म्हटलं आहे.
तरी देखील युजर्सचं रेकॉर्डिंग त्यांचे कर्मचारीही ऐकत असल्याची बाब अटींमध्ये सांगितलेली नसल्याचा मुद्दा बैठकीदरम्यान एका सदस्याने उपस्थित केला आहे.
यावरून आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Google चा पहिला अंतरिम रिपोर्ट जारी; सांगितले – ‘27,700 यूजरच्या तक्रारीनंतर एप्रिलमध्ये हटवले 59000 कंटेन्ट’