तातडीनं Delete करा ‘हे’ 29 धोकादायक Apps, Google नं प्ले स्टोअरवरूनही हटवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अनेक अ‍ॅप्स धोकादायक असल्याचे समोर आल्यानंतर गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा गुगलने प्ले-स्टोअरवरील 29 धोकादायक अ‍ॅप्सना हटवले आहे. हटवण्यात आलेले बहुतांश फोटो एडिटिंग अ‍ॅप्स आहेत. हे धोकादायक अॅप्स फोनमध्ये ऍडवेअर इंस्टॉल करत होते. White Ops च्या इंटेलिजन्स टीमने या धोकादायक अ‍ॅप्सची माहिती अगोदर दिली.
हे अँड्रॉईड अ‍ॅप्स ‘आऊट-ऑफ -कॉन्टेक्स्ट’ जाहिराती दाखवत होते. युजर्सनी हे अॅप्स इस्टॉल केल्यानंतर लगेच त्यांचा ‘आईकॉन’ गायब होत होता. त्यामुळे या अॅप्सना पुन्हा डिटेक्ट करता येत नव्हतं.

तर प्ले-स्टोअरवरही त्या अ‍ॅपसाठी ‘Open’ चा पर्याय दिसायचा नाही. जवळपास 35 लाखापेक्षा अधिक जणांनी हे धोकादायक अ‍ॅप्स आपल्या फोनमध्ये डाऊनलोड केले आहेत. गुगल प्ले स्टोअरवरून हटवले असले तरी ज्यांच्या फोनमध्ये हे अॅप्स अधीपासूनच आहेत, त्यांना ते स्वत: डिलिट करावे लागणार आहेत.

ही आहेत हटवलेल्या अ‍ॅप्सची यादी –

1. Auto picture Cut
2. Color Call Flash
3. Square Photo Blur
4. Magic Call Flash
5. Easy Blur
6. Image Blur
7. Auto Photo Blur
8. Photo Blur
9. Photo Blur Master
10. Super Blur Master
11. Square Blur
12. Smart Blur photo
13. Smart Photo Blur
14. Super Call Flash
15. Smart Call Flash
16. Blur Photo Editor
17. Blur Image