#WomensDay : महिलादिनानिमित्त गुगलकडून ‘ती’चा खास सन्मान

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – आज जगभरात आंतरराष्‍ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. इंजिन गुगलनेही महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडलद्वारे महिलांना मानवंदना दिली आहे. यामध्ये प्रेरणादायक कोट्समध्ये जगभरातील प्रतिभावंत महिलांचा एक समूह डिझाईन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या डूडलच्या स्‍लाईडला सोशल मीडियावर शेअर करण्याचा ऑप्शनही देण्यात आला आहे.

या गुगल डूडलमध्ये १४ भाषांमध्ये महिलांच्या सशक्‍तीकरणावर अधारित प्रेरणादायी कोट्‍स लिहले असून, ते स्‍लाईड स्‍वरूपात मांडले आहेत. कोट्स देणाऱ्या महिलांचे नाव सुद्धा या ठिकाणी वाचता येतात. यात भारताची महिला बॉक्सर मेरी कॉमच्या नावाचाही समावेश आहे. मेरी कॉमने या कोट्समध्ये लिहिलेय की, तुम्ही एक महिला आहात म्हणून तुम्ही स्वत:ला कमकुवत समजू नका’.

एअर इंडियाच्या सर्व विमानांचे सारथ्य महिला पायलट्सकडे

देशाची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाकडून महिला शक्तीचा जागर केला जाणार आहे. त्यानुसार, आज दिवसभरातील सर्व १२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हून अधिक देशांतर्गत विमानांचे सारथ्य केवळ महिला पायलट करणार आहेत. त्याचबरोबर विमानात केवळ महिला क्रू मेंबर्स ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

हेही वाचा – पुण्याच्या ग्राहकाकडून बारबालाच्या अपहरणाचा प्रयत्न