Google चे CEO सुंदर पिचाई म्हणतात, ‘या’ दोन टीम खेळतील क्रिकेट वर्ल्ड कप ‘फायनल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी सर्व टीम जोशात असताना, अनेक दिग्गजांनी क्रिकेट वर्ल्ड कप कोण जिंकेल याची शक्यता वर्तवली आहे. त्यात आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाईची भर पडली आहे. त्यांनी २०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कप बाबत भविष्यवाणी केली असून भारत फायनलमध्ये पोहचेल अशी शक्यता वर्तवली आहे. सुंदर पिचाईने वर्ल्ड कप मध्ये खेळणारा कोहलीच्या सेनेचे समर्थन करत भारताच्या क्रिकेट टीमला फायनलमध्ये जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टीम इंडियाला सुंदर पिचाईच्या शुभेच्छा –

यावेळी सुंदर पिचाई यांनी हे देखील सांगितले की यंदाच्या क्रिकेट फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड या टीम एकमेकांविरोधात खेळतील. त्यासाठी पिचाईने भारताच्या टीमला शुभेच्छा देखील दिल्या.

सुंदर पिचाई यांना यूएसबीआईसीकडून ग्लोबल लीडरशीप अवॉर्ड देण्यात आला आहे. यावेळी यूएसबीआईसीच्या अध्यक्षा निशा देसाई बिस्वाल यांनी गुगलच्या सीईओ सुंदर पिचाई यांना काही प्रश्न विचारले. यावेळी पिचाई यांनी वर्ल्ड कप संबंधित काही चर्चा केली.

मनापासून वाटते टीम इंडिया जिंकावी –

यावेळी पिचाई यांनी सांगितले की, त्यांना क्रिकेट आणि बेसबॉल खेळायला खूप आवडते आणि मला मनापासून वाटते की भारताची टीम वर्ल्ड कप वर कब्जा करेल.

यावेळी त्यांना विचारण्यात आले की कोणत्या टीम फायनल मध्ये खेळतील त्यावेळी त्यांनी सांगितले की, टीम इंडिया आणि टीम इंग्लंड टूर्नामेंटमध्ये एकदम मजबूत होत्या. त्याच दोन टीम वर्ल्ड कप मध्ये फायनलचा पोहचतील. त्यांनी सांगितले की ऑस्ट्रेलियाची टीम देखील वर्ल्ड कप मध्ये उत्तम खेळेल.

सिनेजगत

#Video : ‘नौटंकी’बाज राखी सावंतकडून ‘वाढीव’ व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने केलं ‘ट्रोल’

सार्वजनिक कार्यक्रम चालु असताना ‘त्या’ अभिनेत्रीचा ड्रेस सटकल्याने वातावरण ‘गरम’

#MeToo : नाना पाटेकरांना ‘क्‍लीन चीट’ दिल्याने भडकली तनुश्री, केलं मुंबई पोलिसांबद्दल केले ‘गंभीर’ वक्‍तव्य

ऋतिकचा ‘हा’ जुना फोटो व्हायरल ; सोबत असलेली ‘ती’ लहान मुलगी आजची टॉपची अभिनेत्री