‘Google’ CEO ‘सुंदर पिचाईं’च्या पगारात 14 कोटींची ‘वाढ’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – गुगलचे आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना कंपनीने तब्बल 2 दशलक्ष डॉलर्स इतकी पगारवाढ दिली. एका वृत्तानुसार सुंदर पिचाई यांच्या टेक होम सॅलरीमध्ये यंदा 2 दशलक्ष डॉलरची वाढ झाली. तसेच पिचाई यांना कंपनीकडून 120 दशलक्ष डॉलर्सचे शेअर्स देखील दिले जातील.

गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धूरा सुंदर पिचाई यांच्यावर सोपावण्यात आली. त्यामुळे सुंदर पिचाई आता जगातील सर्वात शक्तीशाली कॉर्पोरेट व्यक्तीमत्व बनले आहे. अल्फाबेटने युनायडेट स्टेट्स सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनला दिलेल्या माहितीनुसार पिचाई यांना 120 दशलक्ष डॉलरच्या शेअरसुद्धा देण्यात आले आहेत.

गुगलच्या अहवालानुसार सुंदर पिचाई यांचे वार्षिक सॅलरी पॅकेज 6 लाख 50 हजार डॉलर आहे. यात वाढ होत आहे. अहवालानुसार पिचाई यांना 120 दशलक्ष डॉलरचे शेअर्स देण्यात आले आहेत. शिवाय प्रोस्ताहन भत्यापोटी 45 दशलक्ष डॉलर्स मिळणार आहेत. पिचाई यांना 2014 साली स्टॉक ऑप्शनमधून 550 दशलक्ष डॉलर मिळाले आहेत. पिचाई यांना 2015 मध्ये 6 लाख 52 हजार 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा पगार मिळाला आहे.

जगातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी वार्षिक पगाराच्या बाबतीत एक शिखर गाठलं आहे. 2016 मध्ये पिचाई यांना पगार व अन्य भत्यांच्या स्वरुपात जवळपास 12.85 अब्ज रुपये मिळाले. आधीच्या तुलनेत रक्कम दुप्पट असून सरासरी काढल्यास त्यांना 100 कोटी मिळाले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/