Google Chrome वर कधीही करू नका या चूका, हॅकिंगला पडू शकता बळी; अँटीव्हायरस सुद्धा करणार नाही काम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Google Chrome | इंटरनेटचे अनेक फायदे आणि तोटेही आहेत. अशा स्थितीत इंटरनेट वापरताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. बरेच लोक इंटरनेट वापरण्यासाठी Google Chrome ब्राउझर वापरतात. गुगल क्रोममध्ये पुन्हा पुन्हा लॉग इन टाळण्यासाठी अनेकदा लोक जीमेलसह (Gmail) सेवांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेव्ह करतात. परंतु, लक्षात ठेवा की असे केल्याने यूजरला महागात पडू शकते. अशा वेळी गुगल क्रोम वापरताना चुका करू नका, अन्यथा हॅकिंगला (Hacking) बळी पडू शकता. (Do Not Make These Mistakes On Google Chrome)

हॅकिंगला पडू शकता बळी

अलीकडेच सिक्युरिटी एक्सपर्ट कंपनी AhnLab ने एका अहवालात खुलासा केला आहे की व्हायरस गुगल क्रोम वरून तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरू शकतो. वास्तविक या फर्मने रेडलाइन स्टीलर नावाचा मालवेअर शोधला आहे. हा मालवेअर गुगल क्रोममध्ये सेव्ह केलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरण्याचे काम करतो. अशा परिस्थितीत हॅकर्स या मालवेअरद्वारे तुमची वैयक्तिक माहिती मिळवू शकतात. यासोबतच ते बँकिंग संबंधी फसवणुक करू शकतात.

अँटीव्हायरस देखील करणार नाही काम (Antivirus won’t work either)

रिपोर्टनुसार हा मालवेअर खूपच धोकादायक आहे. या मालवेअरवर अँटीव्हायरसचाही काही परिणाम होत नाही. असे सांगितले जात आहे की हा मालवेअर कंपनीच्या व्हीपीएनमध्ये प्रवेश करून लॉगिन आणि पासवर्ड चोरण्यात पटाईत आहे. अशा स्थितीत, यूजरना त्यांचा लॉगिन आयडी पासवर्ड गुगल क्रोममध्ये सेव्ह न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या मालवेअरवर अँटीव्हायरसचा कोणताही परिणाम होत नाही. (Google Chrome)

असा करा बचाव

हा मालवेअर टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. गुगल क्रोम ब्राउझरवर पासवर्ड चुकूनही सेव्ह करू नका. तसेच, वेळोवेळी तुमचा पासवर्ड बदलत राहा. नेहमी सुरक्षित आणि अधिकृत वेबसाइट वापरा. याशिवाय मेल, मेसेज किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर येणार्‍या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. विना संरक्षणा वैयक्तिक डेटा आणि इतर महत्त्वाच्या फाइल्स सेव्ह करू नका.

Web Title : Google Chrome | do not make these mistakes on google chrome

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात