व्हॉट्सॲप आणि फेसबुक सारखेच फिचर आता गुगल क्रोम अ‍ॅपमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डार्क मोड हे फिचर सध्या ट्विटर, यूट्यूब, गुगल मॅप्स आणि गुगल मेसेज , व्हॉट्सॲप आणि फेसबुक या ॲप्समध्ये आहे. गुगलच्या वापरकर्त्यांसाठी आता गुगल क्रोम अ‍ॅपनेही हे फीचर आणले आहे. या फिचरमुळे क्रोम वापरकर्त्यांना उत्कृष्ट आणि जलद ब्राउझिंगचा अनुभव मिळू शकणार आहे. हे फीचर रिसोर्स लोडिंग आणि रनटाइम प्रोसेसिंगला रोखत असल्याने वेबपेज जलदगतीने लोड होण्यास मदत होणार आहे.

फिचरची वैशिष्ट्ये –

डार्क मोडमुळे रीडर मोडमध्ये गरज नसलेला सर्व कंटेंट निघून जाईल आणि फक्त आर्टिकल टेक्स्ट आणि फोटो तेवढे पानावर दिसतील. या बरोबरच ‘मॅन इन द मिडल’ (MiTM) फिशिंग अ‍ॅटॅक रोखला जाईल. डार्क मोडमुळे ब्राउझर फ्रेमवर्क अद्ययावत होईल.

गूगलचे नवीन फीचर –

अँड्रॉइड क्रोम अ‍ॅपमध्ये डार्क मोड हे फीचर लेटेस्ट स्टेबल अपडेट डाउनलोड करणाऱ्या यूजरला उपलब्ध आहे. या बरोबरच गुगल आपल्या ब्राउझरमध्ये नव्या रीडर मोडचीही चाचणी करत आहे. हे रीडर मोड सध्या डेस्कटॉप यूजर्ससाठी क्रोम कॅनरीवर उपलब्ध आहे. गुगलने नुकतेच पासवर्ड चेकअप क्रोम एक्स्टेंशन आणलेले आहे. आता लवकरच ब्राउझरमध्ये ‘looklike URLs’ हे फीचरही दिले जाण्याची शक्यता आहे. सर्च इंजिन गुगल नव्या Never Slow Mode वर देखील काम करत आहे.