Google Chrome ब्राउझरमध्ये ‘असे’ पहा आणि डिलीट करा Save केलेले ‘पासवर्ड’ !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गूगल क्रोम (Google Chrome) वेब ब्राउझरमध्ये बऱ्याच वेळा लॉगिन आयडी आणि पासवर्डसाठी आपण जतन केलेला पासवर्ड वापरत असाल. ऑटोफिल सेक्शन अंतर्गत या फिचरचा वापर केला जातो. कोणत्याही अकाउंटला लॉग इन करताना क्रोम आपल्याला विचारतो की आपण यास एखादा जतन केलेला पासवर्ड म्हणून संचयित करू इच्छित आहात का. आपण हा पर्याय निवडल्यास आपल्या अकाउंटचा पासवर्ड जतन होईल.

आपण जतन केलेला पासवर्ड पाहू शकता किंवा आपण त्यास हटवू देखील शकता. यासाठी गूगल क्रोमच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री डॉट (हॅम्बर्गर) आयकॉनवर क्लिक करा. आता आपल्याला येथे बरेच पर्याय दिसतील ज्यामधून सेटिंग्स निवडावे. आता एक नवीन पृष्ठ उघडेल, येथे डाव्या बाजूला ऑटो फिल ऑप्शनवर क्लिक करा.

ऑटो फिलवर क्लिक करताच सर्वात वरती पासवर्डचा पर्याय दिसेल. त्यास एक्सपेंड करावे. आता येथे खाली स्क्रोल करा आणि थोडे खाली गेल्यास आपल्याला जतन केलेल्या पासवर्डची सूची दिसेल. येथे सर्च पर्याय देखील आहे ज्याद्वारे आपण त्या वेबसाईटचे नाव सर्च करू शकतात जिथे आपण पासवर्ड जतन करून ठेवला आहे. पासवर्ड पाहण्यासाठी एक EYE आयकॉन दिसेल ज्यावर क्लिक करायचे आहे.

पासवर्ड पाहण्यासाठी आपल्याला आपला संगणक पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल. यानंतर आपण पासवर्ड पाहण्यास सक्षम असाल. येथेच आपल्याला Remove चा पर्याय देखील मिळतो.

स्मार्टफोनमध्ये कसा पहावा क्रोममध्ये जतन केलेला पासवर्ड

स्मार्टफोनमध्ये गूगल क्रोम मध्ये प्रवेश करून थ्री डॉट्स (हॅम्बर्गर) आयकॉनवर टॅप करा. येथून सेटिंग्समध्ये जाऊन पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्याला येथे जतन केलेल्या पासवर्डची यादी दिसेल. आपणास वाटत असेल तर येथून आपण सर्च देखील करू शकता. पासवर्ड पाहण्यासाठी आपल्याला मोबाइलचा पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक वापरावा लागेल. आपण येथूनही पासवर्ड हटवू शकता.