Google Chrome चा वापर करणार्‍यांनी व्हावे सावध, ताबडतोब करा हे काम अन्यथा होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  गुगलच्या क्रोमियम ब्राऊजरमध्ये (Google Chrome) एक गडबडी (बग) चा खुलासा झाला आहे ज्याचा हॅकर्स चुकीचा वापर करू शकतात. मात्र, गुगलने (Google Chrome) घोषणा केली आहे की कंपनीने ही मोठी गडबड दुरूस्त केली आहे. तरीसुद्धा यासाठी काही काम करण्याची आवश्यकता आहे.

याचा अर्थ आहे की ज्या यूजर्सच्या डिव्हाईसमध्ये गुगल क्रोमियम ब्राऊजर इन्स्टॉल आहे त्यांनी तो ताबडतोब अपडेट करण्याची आवश्यकता आहे.
या गडबडीमुळे हॅकर्स तुमचा डिव्हाईस कंट्रोल करू शकतात, तसेच डेटा लीक होण्याचा धोका आहे.
यासाठी येजर्सने ताबडतोब डिव्हाईसमध्ये क्रोमचे लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करण्याची आवश्यकता आहे.

अगोदरपासूनच वापरात होता नवीन बग

कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, ज्या नवीन बगबाबत समजले आहे तो अगोदरपासूनच वापरात होता ज्याचा अर्थ आहे की यामध्ये झीरो-डे वल्नरबिलिटी (0-day) आहे.
झीरो-डे एक सुरक्षा दोष आहे ज्याचा वापर हॅकर्सद्वारे त्या कंपनीच्या ज्ञानाशिवाय केला जातो ज्यांनी अ‍ॅप किंवा सर्व्हिस डेव्हलप केली आहे. यास डार्क वेबवर लाखो डॉलरमध्ये विकले जाऊ शकते.
Google ने हा सुद्धा दुजोरा दिला आहे की, त्यांना CVE-2021-30563 च्या बगबाबत माहिती आहे.

यूजर्सला होऊ शकते समस्या

ज्या यूजर्सने ब्राऊजर अपडेटद्वारे पॅच केलेला नाही ते या गडबडीला बळी पडू शकतात.
तसेच क्रोम ब्राऊजरमध्ये ओपन सोर्स जावा स्क्रिप्टमध्ये समस्या झाल्याने हॅकर्स त्यांचा डेटा अ‍ॅक्सेस करू शकतात.

Web Title : google chrome users alert update your browser or loose your data

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kareena Kapoor | ‘तू मुलाला विकू शकत नाही’; तैमूरसाठी सैफ अली खानला असं काय बोलली करिना कपूर (Video)

Vikhroli landslide | विक्रोळीत पुन्हा एकदा दरड कोसळली, कारचं नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

Petrol Price | खुशखबर ! ऑगस्टपेक्षा स्वस्त होऊ शकते पेट्रोल, जाणून घ्या काय आहे OPEC देशांचा प्लान