Google नं प्लेस्टोरवरुन हटवले मुलांचा डेटा चोरणारे 3 अ‍ॅप्स, तुम्हीही तात्काळ डिलीट करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गुगलच्या प्ले स्टोरवर येण्यापूर्वी सिक्युरिटी तपासावी लागते. मात्र, यानंतरही अनेक अ‍ॅप्स (Apps) या ठिकाणी पोहोचतात. त्यानंतर युजर्सना नुकसान पोहोचवले जाते. गुगलला अशा अ‍ॅप्शविषयी माहिती होताच गुगल प्ले स्टोरवरुन (google playstore) हटवले जाते. आता गुगलने आणखी तीन अ‍ॅप्सला हटवले आहे. मुलाचा डेटा (childrens data) चोरी करत असल्याचा आरोप या तीन अ‍ॅप्सवर केला जात आहे. डिजिटल अकाउंटेबिलिटी काउंसिल कडून या बाबत चिंता व्यक्त केली जात होती.

IDCA ने हे तीन अ‍ॅप्स युजर्सचा डेटा कलेक्ट करीत असल्याच तसेच या अ‍ॅप्सला मुलासाठी डिझाईन करण्यात आले होते. त्यावरुन हे स्पष्ट झाले आहे की, मुलांचा डेटा कलेक्ट करीत होते तसेच गुगल प्ले स्टोरवरील नियमांचे उल्लंघन करीत होते. गुगलने Princess salon, number coloring आणि Cats & Cosplay हे तीन अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन हटवले आहेत.

गुगलची तात्काळ कारवाई

वेबसाईटने या अ‍ॅप्ससंबंधी गुगलला माहिती दिली. त्यानंतर गुगलने सांगितले की, आम्ही कन्फर्म केले आहे की रिपोर्टमध्ये असलेल्या अ‍ॅप्सला हटवले आहे. ज्यावेळी कोणत्याही अ‍ॅप्सला चालवले जाते आणि ते जर का नियमांचे उल्लंघन करीत असेल तर आम्ही अशा अ‍ॅप्सवर कारवाई करतो, असे गुगलकडून सांगण्यात आले आहे.

गंभीर प्रश्न उपस्थित

IDCA चे अध्यक्ष क्वाटिन पल्फ्रे ने यासंबधी TechCrunch ला सांगितले की, आमच्या रिसर्च टीमने या अ‍ॅप्सच्या डेटाच्या प्रॅक्टिसेजसंबंधी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच हे चिंताजनक आहे.

हे अ‍ॅप्स तात्काळ डिलीट करा

हे तीन अ‍ॅप्स कशाप्रकारे डेटा कलेक्ट करत होती याची सविस्तर माहिती समोर आली आहे. मात्र, मुलांचा डेटा कलेक्ट करणाऱ्या अ‍ॅप्सवरून गुगल आणि अ‍ॅपलचे नियम खूप कडक आहेत. मुलाचा डेटा कलेक्ट करण्याशिवाय थर्ड पार्टीज सोबत शेयर करणे किंवा कंट्रोल करण्याचा अधिकार अ‍ॅप्सला नही, असे पहिल्यांदाच झाले नाही की गुगलकडून अशा अ‍ॅप्सवर कारवाई करत त्यांना हटवले आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.