आज Google चा 21 वा वाढदिवस ! जाणून घ्या खास गोष्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकांना माहिती नसेल परंतु आज गुगलचा 21 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने खास डुडलही गुगलवर दिसत आहे. 21st birthday असं डुडलमध्ये म्हटलं आहे. 27 सप्टेंबर 1998 रोजी गुगलने पहिलं डुडल सुरु केलं होतं. त्यावेळी गुगलने स्वत:चा लोगो वापरून हे डुडल तयार केलं होतं. खोका म्हणून त्या काळी ओळखल्या जाणऱ्या संगणकावर हे डुडल साकारलं होतं. जगातील प्रसिद्ध व्यक्तींच्या वाढदिवस, स्मृतीदिन, सण, समारंभ किंवा मोठ्या घटनांचं डुडल गुगलकडून साकारलं जातं. डुडलमध्ये जुना संगणक दिसत आहे. या जुन्या संगणकावर गुगलचा जुना लोगो असून 98-9-27 अशी तारीखही खाली उजव्या कोपऱ्यात आहे.

गुगलला आजच्या तरुणाईचा गुरू असंही म्हटलं जातं. गुगल आता 100 पेक्षा अधिक भाषांमध्ये आणि 190 देशांमध्ये उपलब्ध आहे. भारतात याहू, मोझिलापेक्षा गुगलचा वापर करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. इथे तुम्ही कोणताही माहिती कधीही कुठेही उपलब्ध होते. 1998 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी एक नवीन सर्च इंजिन सुरू केलं. या माध्यमातून जगभरातील माहिती तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा त्यामागचा हेतू होता.

गुगल शब्दाला ऑक्सफोर्ड डिक्शनरीतही समाविष्ट करण्यात आलं आहे. तुम्हाला माहिती आहे का गुगलचं स्पेलिंग कोणत्या बायनरी कोडींगप्रमाणे आहे. गुगलचे स्पेलिंग 10100 या बायनरी कोडींगप्रमाणे आहे. यालाही खास कारण आहे. 10100 ही संख्या लार्ज स्केल सर्च इंजिन ही संज्ञा आणि उद्देश साध्य करते. गुगल वापरण्यासाठीही सगळ्यात सोपं आहे. गुगल मॅप, गुगल व्हिडीओ कॉलिंग, माहितीचं भंडार असणारं गुगल नेहमीच अनेक फीचर्स लोकांसाठी आणत असतं.

लाल मिरची खाल्ल्याने वाढते आयुष्यमान ! संशोधकांचा दावा
तुम्हाला माहिती आहेत का कांद्याचे ‘हे’ ६ आश्चर्यचकित फायदे, जाणून घ्या
ग्रीन कॉफी’ मुळे बरा होऊ शकतो मधुमेह, ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे
पुरूषांना ‘या’ समस्या ठरू शकतात त्रासदायक, करा ‘हे’ रामबाण उपाय
तुम्हाला घोरण्याची सवय आहे का? मग घरच्याघरीच करा ‘हा’ खास उपाय
मेंदूची क्षमता वाढण्यासाठी ‘हे’ आहे रामबाण औषध, स्वयंपाक घरातच उपलब्ध