कोरोना वॉरियर्ससाठी Google चं खास डुडल, जाणून घ्या कोणाकोणाला म्हंटलं Thank You.

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतासह जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य खात्यातील अनेक जण अहोरात्र काम करीत आहे. या सर्व कोविड योद्ध्यांना सलाम करण्यासाठी गुगलने एक खास डूडल साकारले आहे. या डूडल मधून गुगलने कोरोना वॉरियर्सचे खास आभार मानले आहेत. या डूडलमध्ये डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफला गुगलने खास थँक्यू म्हटले आहे.

आजचे गुगल डूडल हे कोरोनाला हरवण्यासाठी झटणाऱ्या योद्ध्यांना समर्पित केले आहे. जर तुम्ही गुगल ओपन केले तर तुम्हाला गुगल एका नव्या अंदाजात दिसून येईल. गुगलमधील आधीचे G ला दोन पाय दिसत आहेत. दुसऱ्या o आणि G च्या वर लाल रंगाचे दिल बनवले आहे.

याशिवाय E ला पूर्णपणे बदलले दिसत आहे. तसेच गुगलने लिहिले आहे की, To all doctors, nurses and medical workesrs, Thank you. तसेच तुम्ही जर गुगलवर क्लिक केले की गुगल सर्च बार मध्ये thank you coronavirus helpers असे लिहलेले एक नवीन पेज ओपन होते. आजचे डूडल जीवाची पर्वा न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणा-या डॉक्टरांना आणि मेडिकल स्टाफला समर्पित केले आहे.