Google Duplex आश्चर्यकारक ‘गुगल ड्युप्लेक्स’

गुगलने सध्या विविध आश्चर्यकारक टूल्स आपल्याला दिली आहेत. हे वाचून तुम्हाला प्रश्न पडत असेल ना? की, हे कसे काम करते. ‘गुगल ड्युप्लेक्स’ म्हणजे लोकांशी नैसर्गिकपणे संवाद साधणारे आणि विशेष म्हणजे आपण एखाद्या संगणकाशी नाही, तर माणसाशी संवाद साधत आहोत याचा अनुभव देणारे टूल विकसित केले आहे.

‘ड्युप्लेक्स’ असं या टूलचं नाव असून ते कृत्रिमरित्या बुद्धिमत्ता सहाय्यक म्हणून काम करणार आहे. लोकांशी संवाद साधताना ड्युप्लेक्सनं ‘अ..’, ‘हं’ असे उच्चार उपयोगात आणल्याने आपण एका कृत्रिम यंत्राशी बोलत आहोत असे चुकूनही वाटतं नाही.

गूगल ड्युप्लेक्स नावाच्या महत्त्वाकांक्षी टूलवर बरेच दिवस काम करत होते. गूगलने आज त्यांच्या वार्षिक आयओ परिषदेत या टूलची घोषणा केली. ड्युप्लेक्स हे कृत्रिमरित्या बुद्धिमत्ता सहाय्यक म्हणून काम करणार आहे. हे ड्यूप्लेक्स लोकांना फोन करू शकते, तसेच ते लोकांशी सफाईदारपणे संवाद साधु शकते. हा संवाद होत असताना आपण यंत्रमानवाशी बोलत असे चुकून सुद्धा वाटत नाही.

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी हे ड्युप्लेक्स नेमके कसे काम करते, याचे प्रात्यक्षिक दाखवले. हे ड्यूप्लेक्स केस कापण्यासाठी कशा प्रकारे हेअर ड्रेसरची अपॉइंटमेंट घेते हे पिचाईंनी जेव्हा प्रत्यक्ष दाखवले.