Google द्वारे तुम्ही दरमहा घरबसल्या कमावू शकता 50 हजार रुपये, जाणून घ्या काय करावे?

नवी दिल्ली : Google | सध्या स्मार्टफोन (Smartpones) तर प्रत्येकाकडे आहे. बहुतांश कामे स्मार्टफोनवरून होऊ लागली आहेत. जर तुम्ही स्मार्टफोनचा वापर करत असाल तर त्यावरून कमाई (Earn money) सुद्धा करू शकता. होय, स्मार्टफोनचा योग्य प्रकारे वापर करून तुम्ही दरमहिना 50 हजार रुपयांपर्यंत कमावू शकता. यासाठी गुगलची मदत घ्यावी लागेल. अतिरिक्त इन्कमसाठी Google वर रिव्हॉर्ड मिळतात, ज्याद्वारे कमाई करू शकता.

Google Opinion Rewards काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन मूव्ही रेंटल घेणे किंवा आपल्या पसंतीच्या गेममध्ये इन-अ‍ॅप खरेदी करणे सोपे बनवणे. याद्वारे तुम्ही एखाद्या मुद्द्यावर आपले मत मांडू शकता आणि बदल्यात पैसे कमावू शकता. जाणून घेवूयात कसे?

गुगलच्या या सर्वेमध्ये व्हावे लागेल सहभागी

Google Opinion Rewards मध्ये तुम्ही सहज पैसे कमावू शकता. यासाठी गुगल विविध मुद्द्यांवर सर्वे करतो. तुम्हाला या सर्वेमध्ये सहभागी व्हावे लागेल. यासाठी सर्वप्रथम मोबाइलवर गुगलचे हे फीचर अपलोड करावे लागेल. सर्वेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला दिवसात 50 ते 500 रुपयांपर्यंत मिळू शकतात. मात्र, कमाईचे हे माध्यम त्या सर्वेवर आधारित आहे. तुम्ही सर्वेतून मिळालेले पैसे इच्छा असल्यास गुगल रिव्हार्ड पॉईंटमध्ये कन्व्हर्ट करून दुसरी ऑनलाइन खरेदी करू शकता.

अशाप्रकारे होईल 50 हजारपर्यंत कमाई

अशाप्रकारे तुम्ही आयपोलद्वारे सुद्धा कमाई करू शकता. हे इंक कॉर्पोरेशन स्मार्टफोन फीचर आहे.
याद्वारे सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा कमाई करू शकता. यामध्ये तुम्हाला गुगल ओपिनियनच्या तुलनेत जास्त
पैसे मिळतील. मात्र, फीचर जवळपास समान आहेत.

यामध्ये तुम्हाला एक सर्वे पूर्ण करण्यासाठी 100-1000 रुपयेपर्यंत मिळू शकतात. समजा महिन्याचे
50 सर्वे केले तर तुमची कमाई 5 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत होऊ शकते. मात्र, यामध्ये अनेक
अटी सुद्धा लागू आहेत. येथे पैसे तुम्हाला पायपल अकाऊंट किंवा अमेझॉन आय ट्यून्स अकाऊंटद्वारे मिळतील.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील निलंबीत पोलिसावर खुनी हल्ला, दोघे ताब्यात तर 9 जणांविरूध्द FIR

Anti Corruption | महसूल विभागातील वरिष्ठ महिला अधिकार्‍यासह कोतवाल 1,00,000 ची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Google | easy way to earn money from smartphone google check what is the process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update