Google मध्ये सुद्धा लेबर यूनियन ! वेतन, शोषणाच्या विरूद्ध लढण्यासाठी बनवली संघटना

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – जगातील टॉप टेक कंपन्यांमधील एक असलेल्या गुगलमध्ये सुद्धा कर्मचार्‍यांनी एक युनियन बनवली आहे. ही युनियन कर्मचार्‍यांसाठी चांगले वेतन, नोकरीची सुविधा, चांगले वर्क कल्चर यासाठी काम करेल. या युनियनमध्ये आतापर्यंत 200 पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून गुगलवर अमेरिकेच्या कामगार नियामक संस्थेने कर्मचार्‍यांसोबत अ-व्यवसायिक व्यवहाराचा आरोप केला आहे.

या युनियनचे नाव अल्फाबेट वर्कर्स युनियन ठेवण्यात आले आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार, या युनियनच्या नेत्याने सोमवारी न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहून युनियनचे उद्देश स्पष्ट केले आहेत. युनियनच्या नेत्याने लिहिले आहे की, अल्फाबेट वर्कर्स युनियनचा उद्देश आहे की, सदस्यांनी योग्य वेतनावर काम करावे. कंपनीत त्यांचे शोषण होऊ नये, त्यांच्यासोबत सूडाच्या भावनाने काम केले जाऊ नये आणि कर्मचार्‍यांना भेदभावाच्या भितीशिवाय स्वतंत्र होऊन काम करता यावे.

अमेरिकेच्या कामगार नियामक संस्थेने गुगलवर आरोप केला आहे की, ते कर्मचार्‍यांची बेकायदेशीर पद्धतीने चौकशी करत आहेत. यापैकी अनेक लोकांनी कंपनीच्या धोरणाविरूद्ध निदर्शने केली होती आणि एक संघटना बनवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

मात्र, गुगलचे म्हणणे आहे की, त्यांनी उचललेली सर्व पावले योग्य आहेत. टेक इंडस्ट्री जिथे व्यवसायिक दक्षता, टार्गेट आणि परफॉर्मन्स करावा लागतो, अशावेळी लेबर युनियन होणे एक महत्वाचा घटनाक्रम आहे.

अल्फाबेट वर्कर्स युनियनच्या प्रमुखाचे म्हणणे आहे की, आम्ही अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर गुगलमध्ये कर्मचार्‍यांसाठी एक औपचारिक संघटना तयार करत आहेत. त्यांनी म्हटले की, आतापर्यंत 226 कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत.

तर गुगलच्या पिपल ऑपरेशन्स डायरेक्टर कारा सिल्व्हस्टीन यांनी म्हटले की, आमच्या कर्मचार्‍यांचे संरक्षित श्रम अधिकार आहेत, ज्यांचा आम्ही सन्मान करतो, परंतु जसे आम्ही करत आलो आहोत, आम्ही पुढे सुद्धा सर्व कर्मचार्‍यांशी थेट संपर्कात राहू आणि संवाद साधत राहू.