Corona Lockdown : ‘गुगल’नं जाहिरात सेवा शुल्कामध्ये 5 महिन्यांची दिली ‘सूट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोविड -19 या साथीच्या दरम्यान गुगलने आपल्या बातमी प्रकाशकांना (न्यूज पब्लिशर्स) मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलने शुक्रवारी सांगितले की ते आपल्या बातमीदारांकडून (न्यूज पार्टनर्स) पाच महिन्यांकरिता जाहिरात सेवा शुल्क आकारणार नाही. गुगलच्या या निर्णयाचा फायदा जगातील बातम्यांच्या प्रकाशकांना होईल. खरं तर, जगभरातील अनेक बातमी प्रकाशक त्यांच्या डिजिटल व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी गुगल अ‍ॅड मॅनेजरची मदत घेतात. तर या संकटाच्या काळात गुगलने त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्लोबल पार्टनरशिप न्यूजचे संचालक जेशन वॉशिंग म्हणाले की कोरोना विषाणूच्या साथीचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अशा परिस्थितीत गुगल न्यूजने आर्थिक मदत पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जगभरातील वास्तविक पत्रकारिता करणाऱ्या वृत्तसंस्थांना आर्थिकदृष्ट्या मदत दिली जाणार आहे. तसेच वॉशिंग म्हणाले की येत्या काही दिवसांत आमच्या सर्व न्यूज पार्टनर्सना या आर्थिक उपक्रमाबद्दल पूर्ण माहिती दिली जाईल.

खरं तर, बातम्या कव्हरेजसह आलेल्या जाहिराती पत्रकारांना ब्रेकिंग न्यूज लिहिण्यास मदत करतात, जेणेकरून ते सतत त्यांच्या वेबसाइट्स किंवा अ‍ॅप्सला अपडेट करत असतात. गुगल पूर्ण जगात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर बातमी सेवा प्रदान करते. यासाठी ते स्थानिक बातमी प्रकाशकांची मदत घेतात. याव्यतिरिक्त, जगभरातील लघु, मध्यम आणि स्थानिक बातमी प्रकाशकांना त्वरित सहाय्य करण्यासाठी गुगलने जर्नलिझम इमर्जन्सी रिलीफ फंडाची घोषणा केली आहे. हे फंडिंग कोरोना संकटाच्या वेळी त्या सर्व बातमी संस्थांसाठी उपलब्ध आहे, जे स्थानिक स्तरावर वास्तविक बातम्या लिहितात.

प्रदेशानुसार ही फंडिंग काही शंभर डॉलर्सपासून हजारो डॉलर्सपर्यंत असेल. तथापि, गुगलने अद्याप एकूण निधी जाहीर केला नाही. हा निधी मिळविण्यासाठी प्रकाशकांना एक सामान्य अर्ज भरावा लागतो. हा फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल आहे.

या व्यतिरिक्त, गुगल डॉट ओआरजीने इंटरनॅशनल सेंटर फॉर जर्नलिस्ट्स आणि कोलंबिया जर्नलिझम स्कूलच्या डार्ट सेंटर फॉर जर्नलिझम अँड ट्रॉमाला संयुक्तपणे 10 लाख डॉलर चा निधी प्रदान केला आहे. तसेच इंटरनॅशनल सेंटर फॉर जर्नलिस्ट्स रिपोर्टर्सना मदत करण्यासाठी तातडीने साधन पुरवेल. याव्यतिरिक्त, कोलंबिया जर्नलिझम स्कूलचे डार्ट सेंटर या संकटात वेदनादायक आघात झालेल्या घटनांना अवगत करणाऱ्या पत्रकारांना मदत करेल.