WhatApp यूजर्स सावधान ! Google सर्चवर दिसत आहेत व्हॅट्सअपच्या प्रायव्हेट ग्रुप Chat लिंक, यामध्ये कुणीचाही होऊ शकते ‘एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पुन्हा एकदा प्रायव्हेट व्हॉट्सअ‍ॅप (WhatApp Group) ग्रुप गुगल सर्चवर दिसू लागले आहेत, ज्याचा अर्थ हा आहे की, कुणीही व्यक्ती गुगलवर केवळ सर्च करून प्रायव्हेट चॅट ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतो. 2019 मध्ये सुद्धा असा प्रकार घडला होता. ज्यानंतर कंपनीने तो प्रकार ठिक केला होता. याशिवाय आणखी एक प्रकार समोर आला आहे. ज्यामुध्ये यूजर्सचे प्रोफाइल सर्च रिझल्टमध्ये दिसत आहे. या इश्यूमुळे लोकांचे फोन नंबर आणि प्रोफाइल पिक्चर सुद्धा पहाता येत आहे.

व्हॉट्सअप ग्रुप चॅट इन्व्हाइटला इंडेक्स करून वेबवर अनेक प्रायव्हेट ग्रुप उपलब्ध करून देत आहे, कारण त्यांची लिंक गुगलवर सर्च करून कुणाद्वारेही अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते. स्वतंत्र सायबर सुरक्षा रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी काही स्क्रीनशॉट सुद्धा शेयर केले आहेत, ज्यामध्ये गुगलवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅट इनव्हाइटचा इंडेक्स दिसत आहे.

गलवर हजारो इन्व्हाइट लिंक

गुगल सर्च रिझल्टमध्ये हजारो ग्रुप इन्व्हाइट लिंक उपलब्ध आहेत, ज्यापैकी काही ग्रुपवर पॉर्न शेयर केले जात आहे तर काही ग्रुप स्पेसिफिक कम्युनिटी किंवा इंट्रेस्टचे आहेत. गॅझेट 360 च्यानुसार काही असे ग्रुपसुद्धा मिळाले आहेत, जे बंगाली आणि मराठी यूजर्ससाठी आहेत. जे लोक इन्व्हाइट नाहीत ते सुद्धा या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतात.

नुकतेच, व्हॉट्सअ‍ॅपला मोठ्या सुरक्षा संकटाचा सामना करावा लागला, जेव्हा 4,000 पेक्षा जास्त लिंक लोकांना प्रायव्हेट ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहेत, यास गुगलवर इंडेक्स करण्यात आले होते. जे एका मोठ्या प्रमाणात डेटा उल्लंघन आणि कुणालाही या ग्रुपमध्ये सहभागी होण्यात सक्षम दाखवतात.