Google चं शाॅर्ट Video प्लॅटफॉर्मवर ‘पाऊल’; 2 भारतीय Apps मध्ये गुंतवले कोट्यवधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपमध्ये दिग्गज टेक कंपनी गुगलने गुंतवणूक केली आहे. ग्लान्सचं रोपोसो आणि डेलिहंटच्या जोश या दोन अ‍ॅपचा समावेश आहे. ही दोन्हीही अ‍ॅप स्थानिक भाषेत उपलब्ध आहेत.भारतातल्या दोन शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मसाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅपमध्ये गुगलनं गुंतवणूक केली आहे.

दरम्यान, गुगलने रोपोसोशिवाय आणखी एका शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपमध्ये गुंतवणूक आहे. त्याचे नाव जोश अ‍ॅप असं आहे. तब्बल १२ स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. जोश अ‍ॅपचे रोजचे ३६ दशलक्ष युजर्स आहे. महिन्याचे युजर्स ७७ दशलक्ष इतके आहेत. जोशमध्ये गुगलने १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. गुगलसह मायक्रोसॉफ्ट आणि अल्फावेव्ह यांनीसुद्धा डेलीहंटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. याआधी गुगलने भारतात १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं म्हटलं होतं. गुगल फॉर इंडियामध्ये कंपनीने ही घोषणा केली होती. गुगलने आधीच रिलायन्स जिओमध्ये ४. ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती.

भारतीय युनिकॉर्न inMobi ची सहाय्यक कंपनी ग्लान्सकडे रोपोसोची मालकी आहे. रोपोसोचे दिवसाला ३३ दशलक्ष अ‍ॅक्टिव्ह युजर आहेत. महिन्याला जवळपास ११५ दशलक्ष युजर्स आहेत. गुगलने रोपोसो अ‍ॅपमध्ये १४५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यातून कंपनी आता AI क्षमता वाढवण्यासाठी योजना तयार करत आहे. तसंच टेक्नॉलॉजीची मोठी टीम तयार करणे आणि सोबतच विविध प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्नही गुगल करणार आहे.