Google बंद करतय त्याची ‘ही’ खास सर्व्हिस, ‘या’ तारखेनंतर कोणीच करू शकणार नाही वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलने आपले क्रोम अ‍ॅप बंद करण्याची घोषणा केली आहे. गुगलने याबाबत टाइमलाइन शेअर करत म्हटले आहे की, ते जून 2022 मध्ये सर्व प्लॅटफॉर्मवरून क्रोम अ‍ॅप काढले जाईल. ‘9टू5 Google’ च्या मते, लवकरच Google Chrome वेब स्टोअरवर नवीन सबमिशन घेतले जाणार नाहीत, कारण Google Chrome अ‍ॅप बंद केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सबमिशन बंद झाल्यावर डेव्हलपर्स या प्लॅटफॉर्मवर नवीन अ‍ॅप्स आणू शकणार नाहीत. दरम्यान, जुने अ‍ॅप्स अद्याप चालतील आणि विशेष गोष्ट अशी आहे की विद्यमान अ‍ॅपमधील डेव्हलपर जून 2022 पर्यंत अद्ययान्वित करू शकता.

गुगल क्रोम अ‍ॅप :
गुगल क्रोम अ‍ॅप हा वेब-आधारित अ‍ॅप आहे जो क्रोममध्ये स्थापित केलेला आहे आणि तो फोन अ‍ॅपप्रमाणे कार्य करतो. गुगलचे म्हणणे आहे की, हा सपोर्ट 2020 पासून विंडोज, मॅक आणि लिनक्स सारख्या सर्व ठिकाणांवरुन बंद केला जाईल. दरम्यान, शिक्षण आणि एंटरप्राइझ ग्राहकांसाठी, डिसेंबर 2020 पर्यंत तो चालू ठेवला जाईल.

दरम्यान, सामान्यत: Google Chrome अ‍ॅप लोकांमध्ये इतके लोकप्रिय नाही. गुगल क्रोमचे स्वतःचे स्टोअर आहे जिथे अ‍ॅप उपलब्ध आहेत. Google Chrome मध्ये एक्स्टेंशन्स देखील आहेत जे Google Chrome अ‍ॅप प्रमाणेच कार्य करतात.