आता हिंदी-इंग्रजी शिकणं अधिक सोपं ; चिमुकल्यांसाठी गुगलचं नवीन अ‍ॅप लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकणे अधिक सोपे व्हावे म्हणून गुगलने एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. ‘Bolo’ असं या अ‍ॅपच नाव असून भारतामध्ये हे अ‍ॅप सर्वप्रथम लाँच करण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशमधील २०० गावांमध्ये या अ‍ॅपची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या अ‍ॅपचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थांना होणार आहे. लवकरच बंगाली सह अन्य भाषांसाठी ते उपलब्ध केले जाणार आहे. हे अ‍ॅप ५० एमबीचे असून प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. ‘Bolo’ अ‍ॅपमध्ये हिंदी आणि इंग्रजीच्या ५० गोष्टी आहेत. या अ‍ॅपमुळे विद्यार्थांच्या मनातील इंग्रजीविषयीची भिती नाहीसी होणार आहे, अशी माहिती गुगल इंडियाचे उत्पादक नितिन कश्यप यांनी दिली.

असे आहे ‘Bolo’ अ‍ॅप –

‘Bolo’ अ‍ॅपमध्ये आवाज ओळख आणि टेक्स्ट-टू-स्पीच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे अ‍ॅप स्पीच रेक्ग्नेशन व टेक्स्ट टू स्पीच तंत्रज्ञानावर काम करते. त्यात दिया नावाचे एक अ‍ॅनिमीटेड कॅरेक्टर असून ते मुलांना गोष्टी वाचण्यास प्रोत्साहित करते. जेथे शब्दाचा उच्चार अडेल तेथे ते मदत करते जर मुलांचे वाचताना उच्चार चुकले, एखादा शब्द अडखळला तर ते पात्र योग्य पद्धीतने त्या शब्दाचा उच्चार करण्यास मदत करणार आहे. तसेच मुलांनी गोष्ट पूर्ण वाचावी म्हणून प्रेरणा देते. या अ‍ॅपचे डिझाईन असे केले गेले आहे कि ते ऑफलाईन काम करू शकते. या अ‍ॅपमध्ये १०० हिंदी इंग्रजी गोष्टी आहेत. अँड्राईड कीटकॅट ४.४ व त्यापुढच्या सर्व व्हर्जनवरील डिव्हाईसवर ते चालू शकते.

महत्वाच्या बातम्या

जेव्हा नीता अंबानी मुलांशी मराठीत संवाद साधतात

दहा वर्षे लहान प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

विधानसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

५०० रुपयाची लाच स्विकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

राफेल कागदपत्रे चोरी प्रकरण; “चोर घरातलाच, त्याचा आधी बंदोबस्त करा”

You might also like