खुशखबर ! आता तुम्ही स्वतःला Google ‘सर्च’मध्ये समाविष्ट करू शकता, भारतासाठी आलं ‘हे’ फीचर, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलने भारतात व्हर्च्युअल बिझिनेस कार्ड फीचर लॉन्च केले आहे. हे एक प्रकारचे गूगल सर्च फिचर आहे, ज्या अंतर्गत लोकांची ऑनलाइन उपस्थिती आणि त्यांचा व्यवसाय अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल.
गुगलने People Cards नावाचे हे फीचर सर्वप्रथम भारतात लाँच केले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. इंटरनेट वापरण्याच्या बाबतीत भारत जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे.
आता तुम्ही स्वत:ला गुगल सर्चमध्ये देखील ऍड करू शकता. म्हणजेच गुगल सर्चमध्ये फिचर होण्यासाठी ब्लॉग, वेबसाइट किंवा युट्युब अकाउंट असणे आवश्यक नाही.
गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘हे नवीन फिचर लाखो इंडिविज्युअल, इन्फ्लुएन्सर्स, व्यावसायिक लोक, फ्रिलान्सर्स किंवा ज्यांना स्वतःला सर्चमध्ये ऍड व्हायचे आहे, त्यांना मदत करण्यासाठी बनवले गेले आहे, जेणेकरून लोक त्यांना शोधू शकतील. आजपासून भारत भरातील युजर्स त्यांच्या मोबाइल फोनवरून लोकांना शोधू शकतात.’
People Cards बनवणे सोपे आहे आणि ते करण्याचे मार्ग देखील जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम आपल्या गुगल अकाउंटने साइन इन करा.
गुगल सर्च बॉक्समध्ये आपले नाव लिहा किंवा add me to search टाइप करा.
येथे स्वत:ला गुगल सर्चमध्ये समाविष्ट करण्याचा पर्याय समोर येईल.
येथे तुम्हाला तुमची माहिती भरण्यास सांगितले जाईल. जसे कि तुमचे सोशल अकाउंट्स काय करतात ते, फोन नंबर आणि कोणत्या कंपनीत काम करता. यानंतर सेव्ह करा.
येथे आपण प्रोफाइल इमेजही वापरू शकता, जी गुगल अकाउंटशी लिंक्ड असेल. लक्षात घेण्याची बाब म्हणजे तुमच्या फोन नंबर व्हेरिफिकेशनशिवाय गुगल कार्ड बनवू शकत नाही.
महत्त्वपूर्ण म्हणजे कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वप्रथम फोन नंबर मागितला जाईल आणि ओटीपी प्रविष्ट केल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू होईल.