महिलांसाठी खुशखबर ! रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणार्‍यां महिलांच्या सुरक्षेसाठी ‘Google’चं ‘हे’ नवे फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात एकटीने प्रवास करताना स्त्रीयांना बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे महिला एकटीने बाहेर पडताना बराच विचार करतात, किंवा एकटीने बाहेर जाणे टाळतात. परंतू आता याचं सुरक्षेचा विचार करत गूगलने आपल्या गुगल मॅपमध्ये एक सेफ्टी फिचर लॉन्च केले आहे. हे फिचर विशेष करुन त्या लोकांसाठी देण्यात आले आहे. जे टॅक्सी किंवा रिक्षाने प्रवास करतात.

काय आहे हे विशेष फिचर-

‘स्टे सेफ’ नावाचे हे फिचर इंडियात नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. यात प्रवासासाठी निघायच्या आधी आपल्याला फक्त आपली लाइव लोकेशन आणि डेस्टिनेशन आपल्या कोणत्याही जवळच्या नातेवाइकाला, मित्रांना शेअर करा. हे तसेच आहे जसे तुम्ही व्हाट्सअ‍ॅपला तुमचे लोकेशन शेअर करतात. परंतू यात ही विशेषता देण्यात आली आहे की, तुम्ही प्रवास करत असलेली टॅक्सी किंवा रिक्षाने प्रवास करतात ठरलेल्या मार्गाने न जाता दुसऱ्या मार्गाचा वापर केल्यास ज्यांना तुम्ही लोकेशन शेअर केले आहे त्यांना मेसेज जातील.

गुगलने सांगितले की भारतातील लोक हे फिचर अ‍ॅण्ड्राईड फोनमध्ये वापरु शकतात. फक्त गुगल मॅपचे नवी वर्जन अपडेट करावे लागेल.

कसे वापरु शकतात हे फिचर –

सर्वात आधी आपल्याला मॅप ओपन करावा लागेल.

त्यानंतर स्टे सेफर आणि गेट ऑफ रुट अलर्ट्स ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.

तुम्ही प्रवास करत असलेल्या टॅक्सी किंवा रिक्षाचा ड्रायवर ठरलेल्या रस्त्याच्या ५०० मीटर इकडे तिकडे गेल्यास तुम्हाला एक मेसेज येईल.

त्यात लिहिलेले असेल की, तुम्ही आता कुठे आहात आणि तुम्हाला कुठे असले पाहिजे.

तुम्ही तूमच्या जवळील लोकांना तुमच्या प्रवासाचे लाईव्ह स्टेट्स पाठवू शकतात. म्हणजेच त्यांना देखील तुमचे स्टेट्स कळेल. तसेच असे देखील सांगण्यात येईल की तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही योग्य मार्गावर नाही आहात.

ह्या फिचर मुळे आता तुमची टॅक्सी ट्रॅक करत बसण्याची कोणाला गरज भासणार नाही.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक