Google नं लॉन्च केलं ‘सोशल डिस्टेन्सिंग अ‍ॅप’, जाणून घ्या ‘कोरोना’पासून बचावासाठी कशी होईल तुम्हाला मदत

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वात मजबूत शस्त्र सोशन डिस्टन्सिंग आहे. लॉकडाऊनमध्ये तर सर्वजण आपल्या घरात बंद होते, त्यामुळे कोरोनाचा धोका जास्त नव्हता, परंतु आता लॉकडाऊनमध्ये मोठी सूट मिळाली आहे. नोकरी, व्यवसायासह अन्य कामांसाठी बाहेर पडावे लागत आहे, अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.

सोशल डिस्टन्सिंगसाठीमध्ये योग्य अंतर राखण्यासाठी आता गुगलचे अ‍ॅप उपयोगी पडणार आहे. हे अ‍ॅप स्मार्टफोन कॅमर्‍याच्या मदतीने युजरच्या चारही दिशेला दोन मीटरवर एक व्हर्च्युअर रिंग तयार करते. या अ‍ॅपच्या मदतीने लोक आपसात दोन मीटरचे अंतर ठेवू शकतील. गुगलचे हे अ‍ॅप ऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटीच्या मदतीने तुमच्या चारही बाजूला एक व्हर्च्युअल रिंग तयार करेल. यासाठी अ‍ॅप स्मार्टफोन कॅमेर्‍याची मदत घेईल.

गुगलचे हे डेवरी अ‍ॅप असे करेल काम

या अ‍ॅपचे नाव सोडर आहे. याद्वारे सोशल डिस्टन्सिंग गाईडलाइन्स फॉलो करण्यास लोकांना मदत होईल. या अ‍ॅपद्वारे माहित मिळेल की दुसरी व्यक्ती दोन मीटर रेंजच्या आत उभी आहे आणि सोशल डिस्टन्सिंग फॉलो करत नाही. हे अ‍ॅप तुम्हाला सतत अलर्ट करत राहील.

स्मार्टफोन कॅमेर्‍याच्या मदतीने हे अ‍ॅप युजरच्या चारही बाजूला 2 मीटरची एक रिंग तयार करेल आणि फोनचा कॅमेर्‍याने ही रिंग दिसू शकते. अशावेळी जर कुणी तुमच्या व्हर्च्युअल रिंगच्या आत आले तर तुम्हाला सावध राहावे लागेल.

असे करा अ‍ॅप डाऊनलोड
गुगलने म्हटले आहे की, या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स मोबाईल डिवाइसचा वापर करून चारही बाजूला रिअ‍ॅलिटीवाली दोन मीटरची रिंग बनवू शकतात. यामुळे युजरला जवळ आलेल्या व्यक्तीची माहिती मिळू शकते. गुगलचे हे अ‍ॅप स्मार्टफोनवर डाऊनलोड करण्यासाठी https://sodar.withgoogle.com/वर जावे लागेल. यानंतर समोर दिसणार्‍या क्यूआर कोडला आपल्या स्मार्टफोनने स्कॅन करावे लागेल. गुगलचे हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध नाही.

सध्या हे अ‍ॅप अँड्रॉइड डिवाइसवर गुगल क्रोम ब्राऊजरच्या मदतीने काम करेल. क्यआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही मोबाईल साईटवर जा आणि व्हर्च्युअल रिंग अ‍ॅक्टिवेट होईल. ज्यानंतर हे अ‍ॅप तुम्हाला सोशल डिस्टन्सिंगसाठी मदत करून कोरोना सारख्या महामारीपासून वाचण्यात मदत करेल.