‘या’ स्मार्टफोन्समध्ये नाही मिळणार Android 11 चे अपडेट, Google चा नवा नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अँड्रॉईड 11 चे बीटा वर्जन काही काळापूर्वी जारी करण्यात आले आहे. जर तुम्हाला सुद्धा अँड्रॉईड 11 अपडेटची प्रतिक्षा असेल तर तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की, तुमच्या फोनची स्पेसिफिकेशन्स काय आहे.

गुगलचे मोबाईल ऑपरेटिंग वर्जन अँड्रॉईड 11 साठी आता मिनिमम रिक्वायरमेंट ठरवलेली आहे. म्हणजे जर ठरवलेल्या स्पेसिफिकेशन्सवाला स्मार्टफोन तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अँड्रॉईड 11 चे अपडेट मिळणार नाही.

अँड्रॉईड 11 अपडेटसाठी स्मार्टफोनमध्ये किमान 2जीबी रॅम असणे आवश्यक आहे. रिपोर्टनुसार ज्या स्मार्टफोनमध्ये 512 एमबी रॅम आहे, त्यांना सपोर्ट मिळण्यात सुद्धा अडचण येईल.

अजून अँड्रॉईड 11 चे पब्लिक वर्जन आलेले नाही, परंतु या वर्षीच्या चौथ्या तिमाही पर्यंत कंपनी स्मार्टफोन मेकर्सना याचे फायनल वर्जन देईल. यानंतर स्मार्टफोन कंपन्या आपआपल्या स्मार्टफोन्समध्ये अँड्रॉईड 11 चे अपडेट पुश करतील.

2जीबी रॅमने कमी कन्फ्यूगरेशनसह लाँच करण्यात येणार्‍या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड गो एडिशन देणे जरूरी आहे. कारण हे गुगलच्या अँड्रॉईड गो एडिशन लो एन्ड स्मार्टफोन्ससाठीच डिझाईन केले आहे.

गुगल अँड्रॉईड 11 गो एडिशन डिव्हाइस कन्फ्यूगरेशन गाईड लीक झाले आहे. यामध्ये लिहिले आहे की, अँड्रॉईड 11 सह 512 एमबी रॅम वाले डिव्हाइस प्रीलोडिंग जीएमएससाठी योग्य असणार नाहीत.

गुगलच्या या लीक्ड शीटमधून ही गोष्ट समोर आली आहे की, या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत लाँच होणार्‍या 2जीबी रॅमपेक्षा कमी वाल्या अँड्रॉईड 10 स्मार्टफोन्समध्ये अँड्रॉईड गो एडिशन देणे अनिवार्य असेल.

महत्वाचे म्हणजे जे स्मार्टफोन्स 2जीबी रॅम वाले आहेत आणि ते जुन्या अँड्रॉईड वर्जनसोबत लाँच केले आहेत, तर त्यांना जर स्मार्टफोन कंपनीची इच्छा असल्यास नव्या वर्जनचे अँड्रॉईड 11 देऊ शकते, कारण हे स्मार्टफोन्स या रिक्वायरमेंटच्या बाहेर असतील.