‘कोरोना’पासून लोकांचे ‘संरक्षण’ करण्यासाठी Google Map ने लाँच केले नवीन ‘फिचर’, ट्रेनचा प्रवास सुरक्षित होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलने आपल्या गुगल मॅपमध्ये एक नवीन फिचर सुरु केले आहे. ज्यामुळे युजर्सला कोरोना काळात प्रवास करताना प्रतिबंधाबद्दल अलर्ट मिळेल. गुगलने म्हणले आहे की, नवीन फिचरमुळे विशिष्ट रेल्वे स्थानकावर लोकांची किती गर्दी आहे किंवा किती गर्दी असू शकते किंवा एकाद्या विशिष्ट मार्गावर बसेस आपल्या वेळेनुसार सुरु आहेत का हे या फिचरच्या माध्यमातून तपासता येऊ शकेल.

गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, अर्जेंटिना, फ्रान्स, नेदरलँड्स, युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडममध्ये हे ट्रांझिट अलर्ट फिचर लाँच केले आहे. गुगल मॅपच्या या नवीन फीचरच्या मदतीने यूजर्सना प्रतिबंधित सीमांची माहिती तात्काळ मिळू शकेल, असे ब्लॉक पोस्टमध्ये म्हटले आहे.

जर आपल्या शहरात कोविड-19चा प्रादुर्भाव असल्यास आपण आता गुगल मॅपच्या सहाय्याने बाधित भागाबद्दल जाणून घेऊ शकता. तसेच गुगल मॅप स्किनवर अलर्ट हे ऑपशन निवडल्यास, आपल्याला सध्याच्या मॅप व्ह्यूवर कोरोना बाधित क्षेत्रा संबंधित कामाच्या लिंक उपलब्ध होती.
नुकतेच कंपनीने लॉकडाऊन अंतर्गत गतिशीलता तपासण्यासाठी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना मुल्यांकन करण्यासाठी हे फायदेशीर ठरले आहे. अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी 131 देशांमधील गुगल युजर्सच्या फोनवर ठिकाणाच्या माहितीचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणाचा हेतू हा आहे की, लोक व्हायरस तपासणीसाठी जारी केलेल्या समाजिक आणि इतर आदेशांचे पालन करीत आहेत कि नाही हे जणून घेता येईल.