Google Maps मध्ये चालू झालं ‘इंकॉग्‍निटो’ मोड, जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर गुगलने आपल्या ग्राहकांसाठी मॅपमध्ये इंकॉग्निटो मोडला सुरुवात केली आहे. गुगलने या आधी यु ट्यूब आणि व्हाईस असिस्टनमध्ये इंकॉग्निटो मोडला सुरुवात केली होती. इंकॉग्निटो या मोडमध्ये युझर्सला पहिल्यापेक्षा अधिक प्रायवसी मिळते.

इंकॉग्निटो मोडचे फायदे
सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे इंकॉग्निटो मोडचा वापर केल्यावर तुम्ही काय काय ओपन केले आणि काय माहिती पाहिली याची हिस्ट्री या मोडमध्ये सेव्ह होत नाही. तसेच या मोडमुळे तुम्हाला सहज कोणी ट्रक करू शकत नाही. सर्च केलेल्या कोणत्याही गोष्टीचा डेटा यामध्ये सेव्ह होत नाही.

इंकॉग्निटो मोडसाठी युट्युब वर ऑटो डिलीट ऑप्शन देखील जोडलेला आहे. या फीचरच्या माध्यमातून युझर्स डेटा डिलीट करण्याचा अवधी सेट करू शकणार आहेत. सेट केलेल्या कालावधीमध्ये आपोआप डेटा डिलीट होणार आहे.

तसेच गुगलकडून लवकरच व्हाईस असिस्टेंटचे नवीन फिचर काढणार आहे. त्यानंतर ‘हे गुगल डिलीट माय लास्ट थिंग आय सेंड टू यु’ असे म्हणून जुना डेटा डिलीट करू शकणार आहात.