Google Maps ने लाँच केले ‘हे’ भन्नाट फिचर; होणार मोठा फायदा

नवी दिल्ली : सध्या कोणत्याही अज्ञात ठिकाणी जाण्यासाठी आपण Google Maps चा वापर करतो. या ऍप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पण आता Google Maps ने एक भन्नाट फिचर लाँच केले आहे. याचा फायदा अनेकांना होणार आहे. यामध्ये कस्टम वॉलपेपरचाही समावेश आहे.

Google Maps ने आता एक फिचर लाँच केले आहे. सध्या डार्क मोडवर फीचरचा समावेश केला जाऊ शकतो. जेव्हा युजरला हे फिचर सुरु करायचे असल्यास ते ऑन किंवा ऑफ करू शकतील. कंपनीकडून जगभरातील युजर्ससाठी नवा डार्क थीम गुगल मॅप्स फिचरला रोल आउट केले जात आहे. गुगल मॅप्स ऍप्लिकेशनच्या सेटिंगमध्ये जाऊन युजर्सला ‘डार्क मोड’ फिचर ऍक्टिव्हेट करता येऊ शकते. त्यासाठी युजर्सला थीमवर टॅप करावे लागेल. Always in Dark Theme वर क्लिक करावे लागणार आहे. इतकेच नाहीतर तुम्हाला लाईट मोडमध्ये ऍपचा वापर करण्यासाठी तुम्हाला Always in Light Theme वर क्लिक करावे लागणार आहे.

बॅटरीची होईल बचत

Google Maps ला डार्क मोड फिचर मिळाल्यानंतर हे थीम लाईटवरून डार्कमध्ये बदलले जाऊ शकते. डार्क मोडमध्ये ऍप्सचा वापर केला तर तुमच्या डोळ्यांवर कोणताही जोर पडणार नाही. मोबाईलच्या बॅटरीचा वापरही कमी होऊन बचत होईल.

इतरही फिचर्स

गुगलने इतर फिचर्स अपग्रेड करण्याबाबत सांगितले. अँड्राईड ऑटोमध्ये नव्या फिचरच्या रुपात कस्टम वॉलपेपरचाही समावेश होणार आहे. ज्यामध्ये वाहनचालकांच्या पसंतीनुसार, पर्सनलाईज्ड करता येऊ शकते.