Google Maps चं जबरदस्त फीचर, वेळेसह होईल इंधनाची बचत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल मॅप (Google Maps) मुळे अनेकदा आपला प्रवास सुखकर होतोच. शिवाय योग्य ठिकाण शोधण्यास देखील मदत होते. गुगल मॅपमुळे आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे तो मार्ग सापडतो. गुगल मॅप फक्त रस्ताच दाखवत नाही, तर कोणत्या मार्गावर ट्रॅफिक जास्त आहे, आणि कोणत्या मार्गावर कमी आहे याची देखील माहिती मिळते. त्यामुळे आपण ज्या मार्गावर वाहुतक कोंडी नाही त्या मार्गावरुन जाऊ शकतो. आता गुगल मॅप एक नवं फीचर आणणार आहे. हे फीचर खूपच फायदेशीर ठरणार आहे. हे फीचर केवळ ट्रॅफिक पासूनच वाचवणार नाही, तर पर्यावरण सुधारण्यास देखील उपयुक्त ठरेल. तसेच या नव्या फीचरमुळे इंधनाची देखील बचत होण्यास मदत होणार आहे.

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 411 नवीन रुग्ण, 1143 रुग्णांना डिस्चार्ज

जाणून कशी होईल इंधन बचत

गुगल मॅपच्या नव्या फिचरमध्ये तुम्हाला असे मार्गसुचवेल, ज्या ठिकाणी ट्रॅफिक कमी असेल. ज्यामुळे चालक एकसमान गतीने गाडी चालवू शकेल. अशा मार्गावर चालकाला सतत गेअर बदलावे लागणार नाहीत, सतत ब्रेक लावण्याची आवश्यकता भासणार नाही.

मशिन लर्निंगच्या माध्यमातून रोड ग्रेड, ट्रॅफिक फ्लो आणि तुमच्या प्रवासाच्या अंतराचा अंदाज लावून, तुमच्यासाठी बेस्ट मार्गाचा सल्ला देईल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवास सोपा होईल आणि इंधनाची बचतही होईल. यामुळे ट्रॅफिक ही कमी होईल, ज्यामुळे पर्यावरण सुधारण्यास काहीसा हातभार लागेल.

‘मराठा आरक्षणाबाबतची भाजपची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाटयावर’

पायी चालणाऱ्यांनाही मदत होईल

गुगल आपल्या स्ट्रिट मॅप्समध्ये सुधारणा करत आहे. यामुळे पायी चालणाऱ्या लोकांना आपल्या मार्गाचा प्लॅन करण्यास अधिक मदत होईल. नव्या सुधारणेमध्ये फुटपाथ आणि रस्त्यांची रुंदी दाखवली जाणार आहे. ज्यामुळे पायी चालणाऱ्यांसह, अपंग व्यक्तींना देखील मदत होणार आहे. याशिवाय मॅपमध्ये देण्यात आलेला लाईव्ह व्ह्यू फीचर आता व्हर्च्युअल स्ट्रिट लायन्ससह, काही इमारतींचं इडोर नेव्हीगेशनही दाखवेल.

कफची समस्या दूर करते केशर, वाचा इतर खास १४ फायदे

Aadhaar Card ची ही सर्व्हिस झाली बंद, जाणून घ्या UIDAI नं असं का केलं, आता तुमच्याकडे काय आहे मार्ग

रागीट स्वभाव असेल तर ‘हा’ सोपा उपाय करून पाहा, स्मरणशक्तीही वाढते

Aadhaar Card ची ही सर्व्हिस झाली बंद, जाणून घ्या UIDAI नं असं का केलं, आता तुमच्याकडे काय आहे मार्ग

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम”