आता गुगल मॅप गाडीचा वेगही सांगणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखादा रस्ता चुकलात किंवा एखादा पत्ता शोधायचा असेल, तर आपण हमखास गुगल मॅपचा उपयोग करतो. गुगल मॅपमुळे कोणतेही ठिकाण शोधण्यास सहजसोपे झाले आहे. गुगल मॅपच्या सेवेमध्ये नवनवीन बदल घडत आहेत. आता गुगल मॅपच्या अ‍ॅपमध्ये लवकरच एक मोठे अपडेट येणार आहे. गुगल मॅपमध्ये गाडीचा वेग सांगणारे फीचर विकसित करण्यात येत आहेत. रस्ता दाखवण्याबरोबरच कोणत्या रस्त्यावर गाडीचा किती वेग असायला हवा, याची माहिती हे अ‍ॅप करून देणार आहे. ‘स्पीड लिमिट फीचर’ असे या फीचरचे नाव आहे.

स्पीड लिमिट फीचर
गुगल मॅपचा स्पीड लिमिट फीचर अ‍ॅपच्या उजव्या बाजुच्या कोपऱ्यात दिसणार आहे. गुगल मॅप स्पीड लिमिट फीचरमध्ये ऑडिओ अलर्टही आहे. जर तुम्ही एखाद्या हायवेवर वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत असाल तर गुगल मॅप तुम्हाला यासंबंधी अलर्ट करून देईल. स्पीड ट्रॅप फीचरचा ट्रॅफिक पोलीस मदत घेतात त्याच अ‍ॅपची मदत गुगल मॅप आपल्या फीचरमध्ये करणार असल्याची माहिती आहे.

गुगल मॅपची सध्या स्पीड लिमिट फीचर अ‍ॅपवर चाचणी सुरू आहे. एका इंग्रजी वेबसाइटच्या माहितीनुसार, अमेरिका, ब्रिटन, आणि डेन्मार्क यासारख्या देशात या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. भारत, कॅनडा आणि ब्राझील यासारख्या देशांसाठी गुगल मॅपमध्ये स्पीड कॅमेरा येणार असल्याचे बोलले जात आहे.