खुशखबर ! ‘Google मॅप’ देणार बस, ट्रेनमधील गर्दीची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्त्यावरील ट्रॅफिकची माहिती देणारे गुगल मॅप आता ट्रेन आणि बसमधील गर्दीची देखील माहिती देणार आहे. एवढेच नाही तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुगल मॅप रेल्वेच्या वेळा देखील सांगणार आहे. रेल्वे आणि बसमधून प्रवास करणाऱ्यांच्या सोयीसाठी ‘गुगल मॅप्स’ने हे नवीन फीचर लाँच केले आहे.

रिक्षांच्या उपलब्धतेचीही माहिती

गुगलकडून युजर फ्रेंडली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्याला युजर्सचा देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतो. गुगल मॅप्सचं हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयओएस यूजर्सना ट्रेनचं वेळापत्रक आणि गर्दीची माहिती मिळणार आहे. याच महिन्यात गुगल मॅप्सनं यूजर्ससाठी अनेक नवीन फीचर लाँच केले आहेत. जूनच्या सुरुवातीलाच बस आणि ट्रेनच्या वेळांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. नव्या अपडेटसह आता रिक्षांच्या उपलब्धतेबाबतही माहिती दिली जात आहे.

लाइव्ह ट्रॅफिक डीले

गुगल मॅप्सनं बस वाहतुकीसाठी ‘लाइव्ह ट्रॅफिक डीले’ हे नवीन फीचर आणलं आहे. ते इस्तंबूल, मनिला, जागरेब आणि अटलांटासारख्या जगातील प्रमुख शहरांत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या फीचरच्या अचूक माहितीचा लाभ ६ कोटी यूजर्सना होत आहे. हे फीचर सर्वात आधी भारतात लाँच करण्यात आलं आहे.

शाहरूख खानची मुलगी सुहानाला मिळाला ‘हा’ बहुमान

Video : पती सैफ अली खानच्या गाण्यावर ‘बेबो’ करिना कपूरचा ‘जलवा’

रक्तचाचणीद्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार

या पाच गोष्टींचा ‘आहारा’त करा वापर, शरीर होईल निरोगी

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like