प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुगल मॅप्स’ आणणार नवीन ‘अ‍ॅप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल मॅप्सच्या सहायाने प्रवास करणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. गुगल मॅप्सने भारतीय युजर्ससाठी एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. ‘ऑफ रूट’ असं या नवीन अ‍ॅपच नाव असून हे अ‍ॅप रस्ता चुकल्यावर अलर्ट करणार आहे. टॅक्सी, कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. सध्या या नवीन अ‍ॅपची चाचणी सुरू आहे.

शहरातील नवीन प्रवासी, महिला यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे फीचर आहे. बऱ्याचदा शॉर्टकट रस्त्याच्या नावाने प्रवाशांची फसवणूक करण्यात येते. या फीचरमुळे या फसवणुकीलाही आळा घालण्यासाठी हे अ‍ॅप विकसित केले आहे.

अ‍ॅपचा उपयोग-

टॅक्सी, कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. टॅक्सी, कॅबने निर्धारीत केलेल्या मार्गापेक्षा ५०० मीटरपेक्षा अधिक चुकीच्या रस्त्यावरून कॅब जात असल्यास गुगल मॅप्सकडून युजर्सला ताबडतोब अलर्ट मिळणार आहे.

एखादा रस्ता चुकलात किंवा एखादा पत्ता शोधायचा असेल, तर आपण हमखास गुगल मॅपचा उपयोग करतो. गुगल मॅपमुळे कोणतेही ठिकाण शोधण्यास सहजसोपे झाले आहे. गुगल मॅपच्या सेवेमध्ये नवनवीन बदल घडत आहेत. यापूर्वी गुगल मॅपमध्ये गाडीचा वेग सांगणारे स्पीड लिमिट फीचर’ लाँच करण्यात आले होते.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

You might also like