आता google देखील आणणार स्मार्ट डेबिट कार्ड , ‘या’ कंपनीला देणार ‘टक्कर’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता गुगल फिजीकल कार्डदेखील बाजारात आणणार आहे. Google फिजिकल आणि व्हर्च्युअल डेबिट कार्ड्स बनवित असल्याची माहिती आहे. एका अहवालानुसार गुगलकडून आलेल्या या डेबिट कार्डची एक इमेज प्रकाशित झाली आहे. या अहवालानुसार गूगल कार्ड व त्याच्याशी संबंधित खात्यातून शॉपिंग करता येते. हे मोबाईल फोनवर किंवा ऑनलाइन वापरले जाऊ शकते.
सिटी आणि स्टेनफोर्ड फेडरल क्रेडिट युनियनसह या कार्डासाठी गुगलने वेगवेगळ्या बँकांमध्ये भागीदारी केल्याचे सांगण्यात आले आहे. हे Google डेबिट कार्ड परीक्षण केले जाऊ शकते आणि Google च्या अॅपशी कनेक्ट केले जाऊ शकते. येथून ट्रांजैक्शन हिस्ट्री पासून बॅलेन्सचेक आणि अकाउंट लॉक सारखे व्यवहार केले जाऊ शकतात.
Google चे फिजिकल डेबिट कार्ड केवळ Google pay अंतर्गत कार्य करेल. महत्त्वाचे म्हणजे गुगलने 2014 मध्ये गुगल वॉलेट लाँच केले. त्यानंतरही कंपनीने वॉलेट बॅलेन्स वापरण्यासाठी डेबिट कार्ड देणे सुरू केले. दोन वर्षांनंतर, २०१६ मध्ये गुगलने हे बंद केले. नंतर हे अॅप गूगल वरून ‘गुगल पे’ मध्ये रूपांतरित झाले. भारताबद्दल बोलायचे झाल्यास ‘तेज अॅप’ येथे सर्वप्रथम लाँच केले गेले, नंतर कंपनीने ते Google pay मध्ये रूपांतरित केले.
महत्त्वाचे म्हणजे गुगलने जर आपले फिजिकल कार्ड लॉन्च केले तर ते थेट Apple कार्डशी स्पर्धा करू शकते. Apple कार्ड भारतात नसले तरी गुगल सुरुवातीला फक्त अमेरिकेत आपले डेबिट कार्ड लॉन्च करेल.
‘गुगल पे’ भारतात खूप लोकप्रिय आहे आणि कंपनी येथे काही डेडिकेटेड फीचर्स देखील देते. अशा वेळी उशीराने का होईना पण , कंपनी भारतात आपले फिजिकल कार्ड लॉंच जरूर करेल अशी आशा आहे.