Google meet नं आणले नवीन फिचर, आता ब्लर होईल बॅक ग्राउंड आणि एकाच वेळी जोडले जाणार 49 लोक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलने आपल्या वापरकर्त्यांसाठी काही नवीन फिचर रोल-आउट केली आहेत. या नवीन फिचरमध्ये बॅकग्राउंड ब्लर करणे आणि एकाच ग्रुपमध्ये 49 लोक जोडण्याचे फिचरचा सामावेश आहे. सर्वात आधी ग्रूप सेटिंग आहे. गूगल मीट आता वापरकर्त्यांना मिटींगमध्ये 49 लोकांना पाहण्याची परवानगी देईल. हे ऑटो आणि टाइल मोडद्वारे केले जाऊ शकते. 9to5Google च्या मते, वापरकर्त्यांना मॅन्युअल स्वरूपात लार्जर व्यूव सक्षम करावा लागेल, कारण ऑटोसाठी डीफॉल्ट व्यू 9 लोक आणि टाइलमधील व्यू 16 लोकांपुरते मर्यादित आहे.

गुगलने एका पोस्टमध्ये म्हटले की, “या लॉन्चमुळे आपण पाहत असलेल्या टायल्सची संख्या समायोजित करण्यासाठी स्लायडरचा वापर करण्यास देखील सक्षम असाल. जेव्हा आपल्याकडे कमकुवत इंटरनेट कनेक्शन असते तेव्हा आपल्याकडे मोठा गट असण्याची किंवा टायल्सची संख्या कमी होण्याची शक्यता जास्त असते. ”

पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “लक्षात घ्या स्लाइडर अजेस्टमेंट प्रत्येक मिटींगसाठी विशिष्ट आहेत, ते प्रत्येक मिटींगमध्ये रीसेट होईल आणि आपण प्रत्येक वेळी कस्टमाइज़ करू शकता. आपल्या विंडोच्या आकारानुसार, आपल्याला कमी टाइल्स देखील दिसू शकतात, कारण उपलब्ध टाइल्स आपल्या स्क्रीनला फीट करण्यासाठी अॅडजेस्ट होतील.

”हे वैशिष्ट्य येत्या आठवड्यात जी सूट आणि वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. झूमच्या बॅकग्राऊंड ब्लर फीचरद्वारे प्रेरित होऊन गुगल मीटने बॅकग्राऊंड ब्लर फीचरसुद्धा लॉन्च केले आहे. हे आपल्या स्क्रीनच्या उजव्या कोपर्‍यात दिसणार्‍या एका नवीन चिन्हाद्वारे सक्रिय केले जाऊ शकते. आपण व्हिडिओ कॉलच्या आधी किंवा दरम्यान बॅकग्राऊंड ब्लर करण्यासाठी सक्षम करू शकता. हे वैशिष्ट्य प्रथम मॅक आणि विंडोज वापरकर्त्यांसाठी क्रोमसाठी उपलब्ध असेल. Chrome OS आणि मोबाइल ॲप समर्थन लवकरच उपलब्ध होईल.