Google Nest Audio स्मार्ट स्पीकर रिव्ह्यू : किंमत योग्य, परफॉर्मन्स सॉलिड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल नेस्ट ऑडिओ भारतात उपलब्ध आहे आणि यावेळी कंपनीने आपल्या स्मार्ट स्पीकरला वेगळ्याच प्रकारे सादर केले आहे. यापूर्वी भारतात गुगल होम ब्रँडिंगसोबत कंपनी स्मार्ट स्पीकर विकत होती.

यावेळी कंपनीने भारतात गुगल नेस्ट ऑडिओच्या नावाने स्पीकर आणला आहे. मार्केटमध्ये हा स्मार्ट स्पीकर उपलब्ध आहे. आम्ही काही दिवस गुगलचा हा स्मार्ट स्पीकर वापरला.

जर स्मार्ट स्पीकर खरेदी करण्याच्या तयारी असाल तर हा रिव्ह्यू वाचून तुम्ही ठरवू शकता तुमच्यासाठी चांगला स्पीकर कोणता आहे.

डिझाईन, फिनिश आणि बिल्ड क्वॉलिटी
* गुगलच्या या स्मार्ट स्पीकरला एक वेगळी डिझाईन दिली आहे.
* स्पीकर फॅब्रिक फिनिशमध्ये आहे आणि यावर व्हिजिबल बटन नाही.
* स्पीकर स्टँडबायवर एकदम क्लीन दिसतो.
* लाईट सुद्धा अशा ठिकाणी दिली आहे की ती ऑन नसेल तर पूर्णपणे अनव्हिजिबल राहते.
* खालच्या बाजूला रबर स्टँड आहे, ज्यामुळे प्लेस करण्याची समस्या नाही. वजनदार आहे, प्लग केल्यानंतरच चालतो.
* यास कनेक्ट करण्यासाठी वायफाय जरूरी आहे. गुगल होम अ‍ॅपद्वारे कनेक्ट करू शकता.
* कनेक्टिव्हिटीसाठी स्पीकर प्लग करा, गुगल होम अ‍ॅपमध्ये जाऊन डिव्हाईस सिलेक्ट करा. यानंतर एक ते दोन मिनिटांच्या आत सेटअप अर्धा पूर्ण होईल.
* गुगल असिस्टंटला तुम्ही तुमच्या आवाजासोबत ट्रेन करू शकता.
* पर्सनलायजेशनसाठी आपला ईमेल आयडी टाकून यास अनेक प्रकारच्या परमिशन देऊ शकता.
* हा स्मार्ट स्पीकर आहे हे पटकन कुणालाही ओळखायल येणार नाही. हा डेस्कवर सहज ठेवता येतो. पण कुठे घेऊन जाणे थोडे अवघड आहे.

स्पेसिफिकेशन्स
* 75 एमएमचा मिड वूफर
* 19 एमएम ट्विटर
* कनेक्टिव्हिटीसाठी ब्ल्यू टूथ 5 आहे.
* वायफाय कनेक्टसाठी 2.4 जीएचझेड आणि 5 जीएचझेडचा सपोर्ट आहे.
* वायरने कनेक्ट करू शकत नाही.

असा आहे ऑडिओ आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स
* यात एक मिड साइज्ड रूमच्या हिशेबाने चांगली साऊंड क्वालिटी दिली आहे.

* हा स्पीकर लाऊड आहे आणि ऑडिओची क्वालिटी या साईजच्या स्पीकरच्या दृष्टीने शार्प आणि रिफाइन्ड आहे.

* बेस सुद्धा डिसेंट आहे. जर फुल साऊंडवर ऐकत असाल तरी सुद्धा वाटणार नाही की, तुम्ही 8 हजार रुपयांच्या स्पीकरने गाणे ऐकत आहात. साऊंड क्वॉलिटी खुपच प्रीमियम आहे.

* गुगल असिस्टंट तुमच्या कमांड्सला उत्तर चांगले देतो. परंतु भारतीय युजर्समध्ये अजूनही गुगल असिस्टंटबाबत खुप कमी माहिती आहे.

* मात्र, भारताच्या दृष्टीने कंपनीने असिस्टंटमध्ये खुपच सुधारणा केली आहे. जर तुमच्या घरात स्मार्ट डिव्हाईस जसे की, स्मार्ट फॅन, लाईट, कॅमेरा वापर आहात तर या सर्वांना तुम्ही सिंक करू शकता.

* गुगल नेस्ट ऑडिओचे मायक्रोफोन्ससुद्धा आवाज चांगला कॅच करतात. मिड साइज खोलीच्या कोणत्याही कोपर्‍यातून तुम्ही कमांड देऊ शकता आणि रिस्पॉन्स मिळू शकतो.

* व्हॉईस कामांड जबरदस्त असले तरी आजून पूर्णपणे हिंदीत करणे आणि भारतीय ग्राहकांच्या हिशेबाने कस्टमाईज करणे बाकी आहे.

You might also like