नो झंझट ! आता Google वरून लोकेशन डेटा, वेब हिस्ट्री आपोआप होणार ‘डिलीट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माहिती देण्यासाठी कोणी उपलब्ध होत नसेल तर गुगल सर्च करून ती माहिती मिळवली जाते. गुगलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तुम्ही काय ‘सर्च’ करता , तुम्ही कुठे कुठे जाता, कोणत्या वेबसाईटना भेट देता, असं एकूणच तुमच्या इंटरनेट विश्वातली कुंडली ‘गूगल’कडे असते. गुगल लवकरच आपल्या युजर्सना लोकेशन डेटा मॅनेज करण्याची ‘ऑटोमॅटीक डेटा डिलीशन टूल’ हे नवीन फीचर लाँच करणार आहे. यामुळे युजर्सना आपल्या डिव्हाईसवरून स्टोर लोकेशन डेटा ऑटोमॅटीकली डिलीट करण्याचा एक पर्याय मिळणार आहे. हे फीचर अल्यानंतर युजर्सची गुगल सेटींगमध्ये वारंवार जाऊन लोकेशन हिस्ट्री आणि डेटा डिलीट करण्याच्या कटकटीपासून सुटका होणार आहे.

ऑटोमॅटीक डेटा डिलीशन टूलची वैशिष्ट्ये –

हे फीचर लोकेशन हिस्ट्री, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीचा स्टोअर केलेला डेटा देखील ऑटोमॅटीकली डिलीट करणार आहे. यासोबतच रिअल टाईम डिव्हाईस ट्रेकींगने स्टोर झालेले गुगल साइट्स, अ‍ॅप्स, गुगल सर्च, गुगल मॅप्स आणि गुगल फोटोज चा डेटा देखील ऑटोमॅटीकली डिलीट करणार आहे. या फीचरनंतर गुगल लोकेशन डेटा ट्रॅक करणार आहे. मात्र आता युजर्स ते डिलीट करू शकणार आहेत. गुगलचं हे नवं फीचर लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

असे सेट करा फीचर –

गुगलचं हे नवीन ऑटोमॅटीक डेटा डिलीशन टूल युजर्स आपल्या स्मार्टफोनमध्ये जाऊन गुगल अकाऊंटच्या सेटींगमध्ये अ‍ॅक्सेस करू शकतात. या ठिकाणी डेटा डिलीट करण्यासंदर्भात काही पर्याय देण्यात आले आहेत. त्यापैकी आपला लोकेशन डेटा ३ महिने किंवा १८ महिन्यांपर्यंत ऑटोमॅटीक डिलीट करू इच्छित असतील तर त्याप्रमाणे पर्याय निवडा. तसेच जर युजर्सच्या अकाऊंटमध्ये १८ महिन्यांआधीचा काही डेटा उपलब्ध असेल तर तो डेटा ही डिलीट करण्याची सुविधा आहे.

Loading...
You might also like