‘Google’कडून ४ ‘फोल्डेबल’ स्क्रीन फोनचं ‘पेटंंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलने एक डिवाइस पेटेंट घेतले आहे ज्यात चार स्क्रीन्सबरोबर हे डिवायस फोल्ड होते. सॅमसंग आणि हुवावे यांनी या आधीच फोल्डेबल स्मार्टफोनची घोषणा घेतली आहे. पंरतू आता गुगलने देखील या रेसमध्ये उडी घेतली आहे. सॅमसंग आणि हुवावे फोनचे डिझाईन एका बुक सारखे म्हणजेच पुस्तकासारखे आहे. सॅमसंगच्या galaxy fold मध्ये आतल्या बाजूने फोल्ड होणारी स्क्रीन देण्यात आली आहे. तर हुवावेच्या Mate X मध्ये बाहेरुन स्क्रीन फोल्ड होते.

गुगल फोल्डेबल फोन एका पुस्तकासारखे असेल ज्यात अनेक स्क्रीन असतील. गुगलने पेंटेंटमध्ये या स्क्रीनला पेज म्हणले आहे. पेटेंट मध्ये दाखवण्यात आलेल्या स्केच नुसार यात ५ पेज दाखवण्यात आल्या आहेत. पंरतू गुगल नंतर यात काही पेज वाढवू अथवा कमी करु शकते. मोबाईलच्या पुढील आणि मागील बाजूस देखील डिस्प्ले असेल. देण्यात आलेले डिझाईन पाहून वाटते की प्रत्येक पेज म्हणजे एक स्क्रीन असेल. ज्याला फ्लिप करुन पुढील विंडो वर शिफ्ट होता येईल, यामुळे मल्टीटास्किंग कामे देखील सहज पार पडतील.

Fold

असे असले तरी गुगलने याबाबत कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. या बाबत देखील अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही की हे डिवाइस गुगल कधी बाजारात आणणार आहे. परंतू हे खरे आहे की या फोन संबंधित विविध प्रयोग सुरु आहेत.

याबाबत माहिती दिली नसली तरी गुगलने सांगितले आहे की कंपनी फोल्डेबल स्क्रीन असलेल्या टेकनॉलाजीवर काम करत आहे. परंतू या फोल्डेबल डिवाइसबाबत गुगलने अजून कोणतीही माहिती दिली नाही. विशेष म्हणजे कंपनी वेगवेगळ्या बाबीवर पेटेंट करत असते परंतू ती वस्तू ते बाजारात कधी आणतील याबाबत अजून तरी काहीही स्पष्ट नाही.