Google Pay कडून 2020 रुपये जिंकण्याची ‘सुवर्ण’संधी, आज शेवटचा दिवस

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गूगल पे आपल्या ग्राहकांना नवीन वर्षात 2020 रूपये जिंकण्याची संधी देत आहे. गूगल पे ने 2020 स्टॅम्प योजना सादर केली आहे, यामध्ये ग्राहक घरबसल्या सहजपणे रोख रक्कम जिंकू शकतात. या योजनेची शेवटची तारीख 31 डिसेंबर म्हणजेच आज आहे.

गूगल पे ची ही स्टॅम्प योजना आणि ग्राहकांना रोख रक्कम जिंकण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती आपण जाणून घेवूयात. 2020 रुपये जिंकण्यासाठी ग्राहकांना स्टॅम्प जमवावे लागतील, ज्याद्वारे तीन लेयरचा केक (3 layer cake stamp) तयार करणे जरूरी आहे.

तुम्हाला हे करावे लागेल
तीन लेयरचा केक तयार करण्यासाठी ग्राहकांना 7 स्टॅम्प जमवावे लागतील, ज्यामध्ये बलून (Balloon), DJ, सनग्लास (Sunglass), डिस्को (Disco), टॉफी (Toffee), सेल्फी (selfie) आणि पिझ्झा (Pizza) आहे. हे 7 स्टॅम्प जमविल्यानंतर युजरला 2020 रुपयांचे बक्षीस मिळेल.

असे जमवा Stamps
यूजर्सला अन्य गूगल पे युजर्सला, बिझनेस अथवा स्पॉट ला 98 रूपयांचे पेमेंट करावे लागेल. दुसर्‍या पद्धतीत युजरला 300 रूपयांचे बिल पेमेंट अथवा मोबाईल रिचार्ज करावे लागेल. युजर आपल्या मित्रांना गूगल पे साठी आमंत्रित करूनसुद्धा स्टॅम्प मिळवू शकतात.

जर तुमच्या रेफरल कोडचा वापर करून तुमचा मित्र पहिले पेमेंट करत असेल तरी सुद्धा स्टॅम्प जिंकता येईल. याशिवाय गूगल पे स्टॅम्पला भेट आणि अ‍ॅक्सेप्ट करूनसुद्धा Stamp जिंकू शकता.

खेळाच्या नियमानुसार, 7 स्टॅम्प जिंकून केकचे तिन्ही लेयर पूर्ण करा, ज्यामुळे स्क्रॅच कार्डद्वारे 202 रूपयांपासून 2020 रूपयांपर्यंतचे बक्षीस तुम्ही जिंकू शकता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/