Google Pay | ‘गुगल पे’चे भारतीयांना खास गिफ्ट, ‘अ‍ॅप’ मध्ये नवीन अपडेट; नवीन फीचरद्वारे युजर्सना होणार मोठा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google Pay | गुगलनं आपल्या डिजिटल पेमेंट अ‍ॅप (Digital Payment App) Gpay मध्ये एका नव्या भाषेचा सपोर्ट अ‍ॅड केला आहे. UPI-बेस्ड Gpay मध्ये आता Hinglish भाषेला स्थान देण्यात आले आहे. याबाबत कंपनीने भारतात याआधीच घोषणा केली होती. अखेरीस हे नवं अपडेट (New Update) जारी करण्यात आले आहे. Hinglish भाषेच्या सपोर्टसोबतच Google Pay मध्ये आता एकूण भाषांची संख्या 10 झाली आहे. यामध्ये इंग्रजी (English), हिंदी (Hindi), बंगाली (Bengali), गुजराती (Gujarati), कन्नड (Kannada), मराठी (Marathi), तामीळ (Tamil) आणि तेलगु (Telugu) या भाषांचा समावेश आहे.

 

Google Pay ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हिंग्लिश (Hinglish) भाषेचा सपोर्ट जारी केला आहे. कंपनीने गेल्या वर्षी हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या या मिश्रणाची घोषणा केली होती, जी आता सर्व वापरकर्त्यांसाठी आणली आहे. नवीन फीचरद्वारे तुम्ही  Google Pay वर इंग्रजीमध्ये हिंदी वाचू शकाल. वापरकर्ते सहजपणे अ‍ॅपला नवीन भाषेत स्विच करु शकतात.

 

या नवीन भाषेच्या समर्थनामुळे केवळ हिंदी वाचता येत नसलेल्या लोकांनाच फायदा होणार नाही, तर इंग्रजी व्याकरणात (English Grammar) कमकुवत असलेल्या वापरकर्त्यांसाठीही हे सोपे होईल. उदा Scan Any QR Code करण्याऐवजी koi bhi QR Code scan karen असे लिहिले जाईल. People च्या जागी Inse Transaction Kiya Gya असे लिहिले जाईल.

 

Hinglish ला डिफॉल्ट भाषा कशी बनवायची ते जाणून घ्या

सर्व प्रथम Google Pay अ‍ॅप उघडा.
शीर्षस्थानी असलेल्या तुमच्या प्रोफाइल चित्रावर टॅप करा.
त्यानंतर Settings वर जा.
सेटिंग्ज मेनूमध्ये, Personal Info वर टॅप करा.
–  त्यानंतर Language वर जा.
येथून तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता.

 

Android आणि iOS साठी  Google Pay दहा भारतीय भाषांना सपोर्ट देते.
गुगल पे च्या या नव्या फिचरचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
तसेच इंग्रजी न येणाऱ्यांसाठी हे फिचर अधिक उपयुक्त ठरणार आहे.

 

Web Title :-  google pay has found a way to hinglish know how to use g pay news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा