‘Google Pay’शी एका पेक्षा जास्त बँक अकाऊंट ‘अॅटॅच’ करा, ‘ही’ आहे सोपी ‘प्रक्रिया’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल पे हे एक ऑनलाइन पेमेंट अॅप आहे ज्यातून UPI च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यास मदत होते. यातून डिजिटल वॉलेट स्टोर्स, ऑनलाइन खरेदी आणि नातेवाइक, मित्रांना पैसे पाठवता येतात. यासाठी तुम्हाला फक्त तुमचे बँक अकाऊंट लिंक करावे लागते. परंतू तुमचे अनेक बँक अकाऊंट असतील तरी देखील तुम्ही ते सर्व अकाऊंट एकाच गुगल पे मध्ये अॅड करु शकता. यात एकापेक्षा अधिक खाते जोडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
यात एकापेक्षा जास्त अकाऊंट अॅड करण्याची सोपी पद्धत –
1. सर्वात आधी Google Pay ओपन करा. सर्वात वर more असा पर्याय आहे, त्यावर क्लिक करा.
2. आता सेटिंगवर क्लिक करा आणि payments methods वर जा.
3. येथे बँक खाते अॅड करा.
4. यानंतर लिस्ट मधील तुम्हाला तुमच्या बँकेची निवड करावी लागेल. तुमच्या बँक कार्ड नंबरवरील शेवटचे 6 अंक आणि एक्सपायरी डेट टाका.
5. तुमची माहिती बँकेच्या माहितीशी व्हेरिफाय करा. व्हेरिफाय केल्यानंतर बँकेकडून तुम्हाला SMS कोड येईल.
6. त्यानंतर तुमचा UPI PIN अॅड करुन कंफर्म करा.
गुगल पे अॅपमध्ये मल्टिपल अकाऊंटमधून यूजर एखाद्या बँकेला तुमचे प्रायमरी अकाऊंट देखील बनवू शकतात. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
1. सर्वात आधी सेटिंगवर जा.
2. त्यात Payments method चा पर्याय असेल, त्याला सिलेक्ट करा.
3. तेथे बँक सिलेक्ट करा. ज्याला तुम्ही प्रायमरी अकाऊंट बनवू शकतात.
4. तेथे तुम्हाला select as primary account निवडावे लागेल.
- डाळिंब आठवड्यातून एकदा तरी अवश्य खावे, आरोग्य आणि सौंदर्यासाठी उपयुक्त
- हातांवर ‘हे’ ४ संकेत दिसतात का? असतील तर व्हा सावध, दुर्लक्ष करू नका
- नवजात बाळाच्या आईसाठी फायदेशीर आहेत ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या
- स्तनाच्या कॅन्सरपासून दूर ठेवतील ‘हे’ ६ ‘सुपरफूड’, आहारात अवश्य करा समावेश
- महिलांनी रोज खावेत हरभरे आणि गूळ! होतील ‘हे’ खास फायदे, जाणून घ्या
- या’ पाच मिनिटांच्या उपायाने ३० दिवसांत कमी होईल वजन, जाणून घ्या
- लहान मुलांना ‘पॅरासिटामॉल’ देताय ? मग ‘ही’ काळजी अवश्य घ्या !
- कोणती भाजी उकडून खाल्ल्याने होतात कोणते आरोग्य फायदे, जाणून घ्या